पुणे :दहावीचा पुणे जिल्ह्याचा निकाल ९६.७७ टक्के

यंदा दहावीच्या परीक्षेत पुणे जिल्ह्याचा निकाल ९६.७७ टक्के लागला.

पुणे :दहावीचा पुणे जिल्ह्याचा निकाल ९६.७७ टक्के
( संग्रहित छायचित्र )

यंदा दहावीच्या परीक्षेत पुणे जिल्ह्याचा निकाल ९६.७७ टक्के लागला. जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील १ लाख २८ हजार ५६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर पुणे विभागातील पाच विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले.

करोना प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी दहावीच्या परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्यात आला होता. मात्र यंदा करोना प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य मंडळाने दहावीची परीक्षा पारंपरिक पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला. यंदा पुणे जिल्ह्यातून १ लाख ३३ हजार ९३० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परीक्षा दिलेल्या १ लाख ३२ हजार ८४७ विद्यार्थ्यांपैकी १ लाख २८ हजार ५६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पुणे जिल्ह्याचा निकाल ९६.७७ टक्के लागला.

तर पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्याचा समावेश असलेल्या पुणे विभागाचा दहावीचा निकाल ९६.९६ टक्के लागला. पुणे विभागातील पाच विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवले असून, विभागात सोलापूर जिल्ह्याने सर्वाधिक ९७.७४ टक्क्यांसह विभागात आघाडी मिळवली. गेल्या वर्षी पुणे विभागाचा निकाल ९९.६६ टक्के लागला होता.

मराठीतील सर्व पुणे न्यूज ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune district result tenth percent pune district examination pune print news amy

Next Story
पुणे : शहरात घरफोडी करणाऱ्या चोरट्याला पकडले
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी