खासगी वित्तीय संस्था तसेच शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एकाने व्यावसायिकाची तब्बल ४८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दीपक रमेश शिंदे (वय,२७ रा.बाणेर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात असून, याबाब एका व्यावसायिकाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी शिंदे आणि व्यावसायिकाची काही महिन्यांपूर्वी ओळख झाली होती. खासगी वित्तीय संस्था, शेअर बाजारातील गुंतवणूक तज्ज्ञ ओळखीचे असल्याची बतावणी शिंदेने व्यावसायिकाकडे केली होती. तसेच, गुंतवणुकीवर जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष देखील शिंदेने व्यावसायिकाला दाखविले होते.

More Stories onपुणेPune
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune entrepreneur cheated rs 48 lakh by showing lure of investment pune print news msr
First published on: 24-06-2022 at 09:57 IST