Pune News EY India : पुण्यातील एका २६ वर्षीय तरुणीच्या मृत्यूनंतर ती ज्या कंपनीत काम करत होती त्या कंपनीवर समाजमाध्यमांवरून टीकेचा भडीमार होऊ लागला आहे. चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या या तरुणीच्या आईने तिच्या कार्यालयातील वरिष्ठांवर गंभीर आरोप केले आहेत. मृत तरुणीच्या आईने म्हटलं आहे की “तिचे कार्यालयातील वरिष्ठ तिला इतकं काम द्यायचे की ती गेल्या काही दिवसांपासून खूप तणावात होती. तिच्यावर कामाचं प्रेशर टाकलं जात होती. कामाच्या ओझ्याखाली असलेली आमची लेक मरण पावली आहे”. या तरुणीने मार्च २०२४ मध्ये ईवाय पुणे या कंपनीत काम करण्यास सुरुवात केली होती. जुलै महिन्यात तिचं निधन झालं. मात्र मृत तरुणीच्या आईने लिहिलेल्या एका भावूक पत्रामुळे ईवाय कंपनी, तिथल्या कामाची पद्धत चर्चेचा मुद्दा बनली आहे.
अॅना सेबेस्टियन पेरायिल असं या निधन झालेल्या चार्टर्ड अकाउन्टंट तरुणीचं नाव आहे. अॅना सेबेस्टियनच्या आई अनीता ऑगस्टीन यांनी ई. वाय. इंडिया कंपनीचे अध्यक्ष राजीव मेमानी यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी मेमानी यांना विनंती केली आहे की “माझ्या मुलीला न्याय मिळायला हवा”. तसेच ई. वाय. इंडिया कंपनीत काही बदल करण्याची आवश्यकता असल्याचं ऑगस्टीन यांनी नमूद केलं आहे.
अनीता यांनी पत्रात लिहिलं आहे की “मी एक दुखी आणि पीडित आई म्हणून हे पत्र लिहितेय. मी माझी मुलगी गमावली आहे. माझी मुलगी १९ मार्च २०२४ रोजी तुमची कंपनी ई. वाय. इंडियामध्ये कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झाली होती. चार महिन्यांनंतर २० जुलै रोजी मला एक धक्कादायक वृत्त मिळालं की माझी लाडकी लेक आता या जगात नाही. ती केवळ २६ वर्षांची होती.
हे ही वाचा >> दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा बळी; महिलांच्या भांडणामध्ये आलेल्या तरुणानं खाल्ला मार; VIDEO एकदा पाहाच
“कामाचे अधिक तास, सुट्टीच्या दिवशी काम करण्याला वरिष्ठांकडून प्रोत्साहन”
ऑगस्टीन म्हणल्या, “कामाचं ओझं, नवीन वातावरण आणि कामाचे अधिक तास यामुळे अॅना शरिराने व मनाने थकली होती. या सगळ्याचा तिला शारीरिक, भावनिक व मानसिक त्रास झाला. चिंता, निद्रानाश आणि तणावाने ती खचून गेली होती. कठोर परिश्रम व चिकाटी ही यशाची गुरुकिल्ली आहे यावर विश्वास ठेवून ती स्वतःला झोकून देऊन काम करत होती. ज्याने तिचं आयुष्य हिरावलं. अॅना ज्या टीममध्ये काम करत होती तिथे कामाचं खूप प्रेशर होतं. त्यामुळे त्या टीममधील तिच्या अनेक सहकाऱ्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आहे. अॅनाचे टीम लीडर तिला प्रोत्साहित करत होते, तू आपल्या टीमची प्रतिमा बदलायला हवी. मात्र त्या प्रोत्साहनामुळे ती तिच्या आयुष्याचं नुकसान करतेय याची तिला जाणीव नव्हती”.
हे ही वाचा >> ट्रॅफिकमधून वाट काढताना बाईकचालक दोन बसच्या मधोमध अडकला; अतिघाई करणाऱ्यांनो हा VIDEO एकदा पाहाच
“कामाच्या ओझ्याखाली छळणारे वरिष्ठ सहकारी अंत्यविधीला आले नाहीत”
अनीता म्हणाल्या, अॅनाला जरादेखील विश्रांती मिळत नव्हती. रात्री उशिरापर्यंत ती काम करत असायची, सुट्टीच्या दिवशी देखील तिला कामं सांगितलं जात होती. ज्या टीम लीडर व व्यवस्थापकाने माझ्या लेकीवर अधिक कामाचं ओझं टाकलं. ज्या ओझ्यामुळे तिचा जीव गेला, तिचे ते सहकारी, टीम लीडर व व्यवस्थापक अॅनाच्या अंत्यविधीला देखील आले नव्हते. कोणीही तिच्यासाठी एक मिनिट काढला नाही.
हे ही वाचा >> VIDEO: धक्कादायक! भरदिवसा तरुणाने कापल्या विजेच्या खांबाचे केबल्स अन् नट; पण घटनेची खरी बाजू काय?
अॅनाने ६ जुलै रोजी सांगितलं की तिच्या छातीत दुखतंय. त्यामुळे तिला पुण्यातील एका रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे तिचा ईसीजी तपासण्यात आला. हृदयरोगतज्ज्ञांनी तिची तपासणी करून, प्राथमिक उपचार व औषधं देऊन तिला घरी पाठवलं. मात्र तिला कामाचा खूप त्रास असल्याचं, तिची झोप पूर्ण होत नसल्याचं डॉक्टरांनी तिच्या पालकांना सांगितलं. तिला आराम करण्यासही बजावलं होतं. मात्र हॉस्पिटलमधून अॅना थेट ऑफिसला गेली आणि रात्री उशिरा परतली. नंतर तिची प्रकृती अजून खालावली. हा सगळा त्रास सहन करत ती कामच करत होती. त्यानंतर दोन आठवड्यांनी हृदयविकाराच्या धक्क्याने तरुणीचा मृत्यू झाला.
© IE Online Media Services (P) Ltd