दीड वर्षांची चिमुकली अडकली बेडरूमध्ये; दरवाजा तोडत अग्निशमन दलाकडून सुखरूप सुटका

पिंपरी चिंचवडमध्ये अवघ्या दीड वर्षांची चिमुकली बेडरूमध्ये अडल्याने अवघं कुटुंब घाबरलं. मात्र, पिंपरी अग्निशमन दलाने दिला सुखरूप बाहेर काढलं.

पिंपरी चिंचवडमध्ये अवघ्या दीड वर्षांची चिमुकली बेडरूमध्ये अडल्याने अवघं कुटुंब घाबरलं. मात्र, पिंपरी अग्निशमन दलाच्या जवानांनी दरवाजा तोडून चिमुकलीला सुखरूप बाहेर काढले. ईशान्वी दिपक इंगवले असं बेडरूमध्ये अडकलेल्या चिमुकलीचे नाव आहे. ती अर्धा ते एक तास बेडरूमध्ये अडकली होती. त्यामुळे ती मोठमोठ्याने रडत होती. ईशान्वी खेळत असताना बेडरूमध्ये गेली आणि खेळता खेळता तिने आतून कडी लावली होती, अशी माहिती अग्निशमन जवानांनी दिली. 

अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, इंगवले कुटुंब पिंपळे सौदागर येथे टूबीएचके फ्लॅटमध्ये राहातं. आज (१ डिसेंबर) दुपारी साडेतीनच्या सुमारास घरातील महिला हॉलमध्ये गप्पा मारत होत्या. यावेळी ईशान्वी बेडरूमध्ये नकळत गेली आणि आतून कडी लावली. दरम्यान, तिचा रडण्याचा आवाज ऐकून घरातील महिला धावत बेडरुमकडे आल्या. त्यांनी ईशान्वीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आलं नाही. त्यामुळे ईशान्वीच्या आईला रडू कोसळलं.

खिडकी अरुंद असल्याने अखेर दरवाजा तोडून चिमुकलीला वाचवलं

घटनेची माहिती पिंपरी अग्निशमन विभागाला देण्यात आली. यानंतर त्यांचं पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं. त्यांनी या मुलीला सुखरूप बाहेर काढू असा धीर कुटुंबीयांना दिला. खिडकी अरुंद असल्याने अखेर दरवाजा तोडून चिमुकलीला बाहेर काढायचं अग्निशमन दलाच्या जवानांनी निश्चित केलं. त्यानुसार, सुखरूपरित्या दरवाजा तोडून ईशान्वीला बाहेर काढण्यात आलं. ईशान्वी संकटातून बाहेर पडल्याचं बघताच तिच्या आईचा जीव भांड्यात पडला आणि त्या धायमोकलून रडू लागल्या. त्यांनी अग्निशमन विभागाचे आभार मानले. 

हेही वाचा : दाभोळकर-पानसरे हत्याकांडाचा तपास, गजा मारणेची ९ किलोमीटर धिंड; पुण्याचे ACP जाधव सेवानिवृत्त

ईशान्वीची सुखरूप सुटका करण्याच्या मोहिमेत अग्निशमन दलाचे जवान विशाल फडतरे, बबाळासाहेब वैद्य, दिग्विजय नलावडे, कृष्णा राजकर, सिद्धेश दरवेश, अर्जुन वाघमारे, स्मिता गौरकर, धनश्री बागुल, श्वेता गायकवाड यांचा सहभाग होता. दरम्यान, आजच्याच दिवशी २ वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलातील शहीद जवान विशाल हनुमंतराव जाधव यांना दापोडी दुर्घटनेत वीरमरण आले होते. त्यांनाही जवानांनी श्रद्धांजली वाहिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pune fire brigade save a girl who lock herself in bedroom mistakenly pbs

ताज्या बातम्या