scorecardresearch

पुणे : स्मशानभूमीत मृतदेहाला अग्नी देताना उडाला भडका; ११ जण जखमी

या घटनेत ११ जण जखमी झाले असून दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहे

Pune fire broke out while setting fire to a dead body in a cemetery
(प्रातिनिधीक छायाचित्र)

स्मशानभूमीत मृतदेहला अग्नी देताना, अचानक भडका उडाल्याने ११ जण जखमी झाले आहे. पुण्यातील संगमवाडी भागातील कैलास स्मशानभूमीत ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत ११ जण जखमी झाले असून दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अग्निशामक विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमवाडी कैलास स्मशानभूमीत एका ४० वर्षीय व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्या व्यक्तीचे नातेवाईक आले होते. यावेळी त्यांनी मृतदेहावर ठेवण्यात आलेल्या लाकडांवर ज्वलनशील पदार्थ टाकला. त्यानंतर मृतदेहाला अग्नी देण्यात आला. यावेळी अचानक भडका उडाल्याने जवळ उभे असलेले ११ जण जखमी झाले आहेत. तर दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. दरम्यान, यातील सर्व जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune fire broke out while setting fire to a dead body in a cemetery 11 injured abn 97 svk

ताज्या बातम्या