scorecardresearch

पुणे : खराडीमधील १२ दुकाने आगीत जळून खाक; लाखो रुपयांचं नुकसान

हॉटेल, प्लायवूड यांच्यासह विविध साहित्याची दुकाने जाळली आहे

Pune Fire
महालक्ष्मी लॉन्स समोरील काही दुकानांना आग लागली

पुण्यातील खराडी येथील महालक्ष्मी लॉन्स समोरील १२ दुकानांना आज सकाळी आग लागली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अग्निशामक विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार,आज सकाळी नऊच्या सुमारास आग लागली.

खराडी येथील महालक्ष्मी लॉन्स समोरील काही दुकानांना आग लागल्याची माहिती आम्हाला मिळाली. काही मिनिटांत आगीने रौद्र रूप धारण केले. या घटनेमध्ये तब्बल १२ दुकाने जळून खाक झाली आहेत. त्यामध्ये हॉटेल, प्लायवूड यांच्यासह विविध साहित्याची दुकाने जाळली आहे. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असून ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता आहे. शहरातील आणि पीएमआरडीएच्या अशा एकूण सहा वाहनांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune fire shops gutted in fire svk 88 scsg

ताज्या बातम्या