पुणे: विसर्जन सोहळ्यानिमित्त शुक्रवारी (२५ सप्टेंबर) शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. शहरातील महत्त्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. विसर्जन सोहळ्यानिमित्त यंदाही वर्तुळाकार वाहतूक योजना राबविण्यात येणार आहे. विसर्जन सोहळ्यानिमित्त शहरातील मध्य भागात मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होते. विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, वाहतूक शाखेचे उपायुक्त डाॅ. संदीप भाजीभाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांचा स्वतंत्र बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. विसर्जन साेहळ्याची सांगता होईपर्यंत शहरातील व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत.

विसर्जन सोहळ्यानिमित्त बंद राहणारे रस्ते

  • छत्रपती शिवाजी महाराज रस्ता : काकासाहेब गाडगीळ पुतळा जंक्शन ते जेधे चौक
  • लक्ष्मी रस्ता : संत कबीर चौकी ते टिळक चौक (अलका चित्रपटगृह चौक)
  • बगाडे रस्ता : सोन्या मारूती चौक ते फडके हौद चौक
  • गुरूनानक रस्ता : देवजीबाबा चौक, हमजेखान चौक ते गोविंद हलवाई चौक
  • गणेश रस्ता : दारूवाला पूल ते जिजामाता चौक
  • केळकर रस्ता: बुधवार चौक ते टिळक चौक
  • बाजीराव रस्ता : स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा ते फुटका बुरूज चौक
  • कुमठेकर रस्ता : टिळक चौक ते विश्रामबाग चौक
  • लालबहादूर शास्त्री रस्ता : सेनादत्त चौकी चौक ते टिळक चौक
  • जंगली महाराज रस्ता : झाशीची राणी चौक ते खंडोजी बाबा चौक
  • कर्वे रस्ता : नळ स्टॉप चौक ते खंडोजी बाबा चौक
  • नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता : खंडोजी बाबा चौक ते फर्ग्युसन महाविद्यालय मुख्य प्रवेशद्वार
  • भांडारकर रस्ता : पीवायसी जिमखाना, नामदार गोखले चौक ते डेक्कन जिमखाना चौक (नटराज चौक)
  • पुणे सातारा रस्ता : व्होल्गा चौक (लक्ष्मीनारायण चौक) ते जेधे चौक
  • सोलापूर रस्ता : ढोले पाटील रस्ता (सेव्हन लव्हज चौक) ते जेधे चौक
  • प्रभात रस्ता : डेक्कन टपाल कार्यालय ते शेलारमामा चौक

वर्तुळाकर वाहतूक योजना

वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेल्या रस्त्यांसाठी पर्यायी मार्ग तयार करण्यात आला आहे. नागरिकांनी त्याचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. कर्वे रस्ता – नळ स्टॉप – विधी महाविद्यालय रस्ता – सेनापती बापट रस्ता – गणेशखिंड रस्ता – वेधशाळा चौक (सिमला ऑफिस) – संचेती हॉस्पिटल – इंजिनियरिंग कॉलेज – डॉ. आंबेडकर रस्त्यावरील शाहीर अमर शेख चौक – मालधक्का चौक – बोल्हाई चौक – नरपतगिरी चौक – नेहरू रस्त्यावर संत कबीर चौकी – सेव्हन लव्हज चौक – वखार महामंडळ चौक – शिवनेरी रस्त्यावरून गुलटेकडी मार्केट यार्ड – सातारा रस्त्याने व्होल्गा चौक – सिंहगड रस्त्याने मित्रमंडळ चौक – सावरकर चौक – शास्त्री रस्त्याने सेनादत्त पोलीस चौकी – अनंत कान्हेरे पथ – म्हात्रे पूल – नळ स्टॉप.

वाहने लावण्यास बंदी

विसर्जनाच्या दिवशी या रस्त्यांवर सकाळी आठ वाजल्यापासून वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे.

  • लक्ष्मी रस्ता : संत कबीर चौकी ते टिळक चौक
  • केळकर रस्ता : बुधवार चौक (मजूर अड्डा) ते टिळक चौक
  • कुमठेकर रस्ता : शनिपार चौक ते टिळक चौक
  • टिळक रस्ता : जेधे चौक ते टिळक चौक
  • बाजीराव रस्ता : पूरम चौक ते फुटका बुरूज चौक
  • शिवाजी रस्ता : काकासाहेब गाडगीळ पुतळा ते जेधे चौक
  • शास्त्री रस्ता : सेनादत्त पोलीस चौकी ते टिळक चौक
  • जंगली महाराज रस्ता : झाशीची राणी चौक ते खंडोजी बाबा चौक
  • कर्वे रस्ता : नळ स्टॉप ते खंडोजी बाबा चौक
  • फर्ग्युसन रस्ता : खंडोजी बाबा चौक ते नामदार गोखले चौक

वाहने लावण्यासाठी व्यवस्था

दुचाकी: पेशवे उद्यान सारसबाग, पाटील प्लाझा पार्किंग, दांडेकर पूल ते गणेशमळा, गणेशमळा ते राजाराम पूल, नीलायम चित्रपटगृह, मराठवाडा महाविद्यालय

दुचाकी आणि चारचाकी: शिवाजी आखाडा वाहनतळ, एआयएसएसपीएमएस मैदान, स. प. महाविद्यालय, संजीवनी मेडिकल कॉलेज मैदान, फर्ग्युसन महाविद्यालय, जैन हॉस्टेल बीएमसीसी रस्ता मैदान, नदी पात्र – भिडे पूल ते गाडगीळ पूल.

शहरातील डायव्हर्जन पाॅईंट

  • जंगली महाराज रस्ता : झाशीची राणी चौक
  • शिवाजी रस्ता : काकासाहेब गाडगीळ पुतळा
  • मुदलियार रस्ता : अपोलो चित्रपटगृह/ दारूवाला पूल
  • लक्ष्मी रस्ता : संत कबीर पोलीस चौकी
  • सोलापूर रस्ता : सेव्हन लव्हज चौक
  • सातारा रस्ता : व्होल्गा चौक
  • बाजीराव रस्ता : सावरकर पुतळा चौक
  • लालबहादूर शास्त्री चौक : सेनादत्त पोलीस चौकी
  • कर्वे रस्ता : नळ स्टॉप
  • फर्ग्युसन कॉलेज रस्ता : नामदार गोखले चौक

जड वाहनांना प्रवेश बंद

विसर्जन सोहळ्यानिमित्त गुरुवारी (२४ सप्टेंबर) रात्री बारा वाजल्यापासून ते शनिवारी (२६ सप्टेंबर) रात्री बारा या ४८ तासांच्या दरम्यान शहरात सर्व जड वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे.