Premium

पुण्यात भाविकांच्या सोयीसाठी लोकसहभागातून २०० स्वच्छतागृहे; गरोदर महिलांना आरामासाठी तीन व्हॅनिटी व्हॅन

गरोदर महिलांना आरामासाठी तीन व्हॅनिटी व्हॅन स्वरूपात हिरकणी कक्ष, पोलीस आणि महापालिका कर्मचाऱ्यांसाठी विनामूल्य भोजन व्यवस्था करण्यात येणार आहे.

pune ganeshotsav 2023, 200 washrooms for ganesh devotees, 3 vanity vans for pregnant womans, free meals to police, free meal to pmc employees, pune police ganeshotsav,
देशभरातील भाविकांचे पुण्याचा गणेशोत्सव प्रमुख आकर्षण आहे. (संग्रहित छायाचित्र)

पुणे : गणेशोत्सवावेळी भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी लोकसहभागातून २०० स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच गरोदर महिलांना आरामासाठी तीन व्हॅनिटी व्हॅन स्वरूपात हिरकणी कक्ष, पोलीस आणि महापालिका कर्मचाऱ्यांसाठी विनामूल्य भोजन व्यवस्था करण्यात येणार आहे. गणेशोत्सवाचे शेवटचे तीन दिवस आणि अनंत चतुर्दशीला ही व्यवस्था पुणे शहरातील गर्दीच्या ठिकाणी करण्यात येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशभरातील भाविकांचे पुण्याचा गणेशोत्सव प्रमुख आकर्षण आहे. शहरातील गणेश मंडळांची सजावट, देखावे पाहण्यासाठी अन्य शहरांतून मोठ्या प्रमाणावर नागरिक येत असतात. या कालावधीत शहरातील अपुऱ्या स्वच्छतागृहांमुळे नागरिकांची विशेषत: महिलांची मोठी अडचण होते. त्यामुळे पालकमंत्री, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही सुविधा देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

हेही वाचा : पुणे : अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ नियोजित वेळेतच सायंकाळी विसर्जन मिरवणुकीत होणार सहभागी

लोकसहभागातून २०० स्वच्छतागृहे, व्हॅनिटी व्हॅनच्या स्वरुपात तीन हिरकणी कक्ष आणि पोलीस तथा मनपा कर्मचाऱ्यांसाठी मोफत जेवणाची व्यवस्था केली आहे. यावेळी गणेशभक्तांची गैरसोय होणार नसून उत्सवाचा आनंद सहज लुटता येईल, असे पाटील यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune ganeshotsav preparation 200 washrooms for devotees 3 vanity vans for pregnant womans and free meal to police pmc employees pune print news apk 13 css

First published on: 25-09-2023 at 16:47 IST
Next Story
पुणे : अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ नियोजित वेळेतच सायंकाळी विसर्जन मिरवणुकीत होणार सहभागी