Pune City Gas Leakage at Gangadham Road Chemical Factory: मार्केट यार्डातील गंगाधाम – बिबवेवाडी रस्त्यावर असलेल्या एका रासायनिक कंपनीतून मध्यरात्री गॅस गळती झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेऊन गॅस गळती रोखल्याने अनर्थ टळला. रासायनिक कंपनीतून गॅस गळती झाल्यानंतर परिसरातील नागरिकांना श्वसनाचा त्रास झाला. त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत अग्निशमन दलाचे एक अधिकारी आणि जवानाला त्रास झाला. त्यांनाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
गंगाधाम रस्त्यावर आईमाता मंदिरासमोर एक रासायनिक कंपनी आहे. या कंपनीतून मध्यरात्री मोठ्या प्रमाणावर गॅस गळती सुरू झाली. गॅस गळती झाल्यानंतर परिसरातील २४ नागरिकांना त्रास जाणवू लागला. डोळे चुरचुरणे, श्वसनाचा त्रास जाणवल्याच्या तक्रारी करण्यात आला. गॅस गळतीची घटना समजल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. सुरक्षाविषयक उपकरणे परिधान (बीए सेट) करुन आधिकारी आणि जवान कंपनीत शिरले. त्यांनी तातडीने गॅस गळती रोखली. नागरिकांना त्रास जाणवू लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवानांनी तातडीने नागरिकांना ससून रुग्णालयात दाखल रुग्णवाहिकेतून दाखल केले.
‘गॅस गळतीमुळे २४ नागरिकांना त्रास झाला. अग्निशमन दलाचे एक अधिकारी आणि जवान यांनाही त्रास झाला. त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणी गंभीर जखमी झाले नाही’, अशी माहिती अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी दिली.
अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच अधिकारी आणि ३० जवान मदतकार्यात सहभागी झाले होते.
गंगाधाम रस्त्यावरील आईमाता मंदिराजवळील रासायनिक कंपनीतून गॅस गळती झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरीत गॅस गळती रोखल्याने अनर्थ टळला. या घटनेत २४नागरिकाना त्रास झाला. त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात आले.- देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी
