‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जावू रंगमहाल‘ ही लावणी सादर करत, गुरुवारी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर बचाव समितीमार्फत घंटा नाद आंदोलन करण्यात आले. यावेळी कलावंतांनी पुणे महापालिकेत सत्ताधारी राहिलेल्या भाजपाचा निषेध व्यक्त केला. जेष्ठ अभिनेत्री रजनी भट आणि जयमाला इनामदार, उपाध्यक्ष विजय पटवर्धन, सुनील महाजन, शशी कोठावळे, योगेश सुपेकर, जितेंद्र वाईकर, शोभा कुलकर्णी, किरण गुजर आदी कलाकार उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले याबाबत प्रतिक्रिया दिली. “बालगंधर्व रंगमंदिर ही वास्तू ऐतिहासिक आहे. ही वास्तु पाडून या ठिकाणी तीन थिएटर उभारले जाणार आहे. या ठिकाणी अनेक शो होतील, असे सांगितले जात आहे. तसेच ज्यावेळी बालगंधर्वच्या कामाबाबत चर्चा झाली त्यावेळी १० कोटींचा खर्च होता. तो आता ११० कोटीवर घेऊन गेले आहेत. यामध्ये नेमकं काही तरी वेगळं दिसत आहे. आता महापालिकेवर प्रशासक असल्याने,कशा प्रकारे काम होईल, आमच्या कलाकार मंडळींसाठी पर्यायी जागा कोणती असणार, तिथे प्रेक्षक येईल का असे अनेक प्रश्न आमच्या समोर आहेत. हे सर्व प्रश्न लक्षात घेता ही वास्तू पाडू नये, अन्यथा आम्ही अधिक तीव्र आंदोलन करू,” असा इशारा मेघराज राजे भोसले यांनी यावेळी दिला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune ghanta naad andolan from balgandharva rangmandir bachao kriti samiti abn 97 svk
First published on: 19-05-2022 at 13:36 IST