scorecardresearch

पुणे : हरियाणातल्या विद्यार्थिनीचे कपडे फाडून विनयभंग; सहकारी विद्यार्थीच आरोपी

धमकावून ८० हजार उकळले; हरियाणा पोलिसांनी संबंधित गुन्हा तपासासाठी लोणीकंद पोलिसांकडे सोपविला आहे.

पुणे : हरियाणातल्या विद्यार्थिनीचे कपडे फाडून विनयभंग; सहकारी विद्यार्थीच आरोपी
(प्रातिनिधिक छायाचित्र )

चोरीचा आरोप करून महाविद्यालयीन युवतीबरोबर अश्लील कृत्यू करुन तिच्याकडील ८० हजार रुपये काढून घेतल्याची धक्कादायक घटना नगर रस्त्यावरील वाघोली भागात घडली. तक्रारदार युवतीने याबाबत हरियाणा पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर संबंधित गुन्हा हरियाणा पोलिसांनी लोणीकंद पोलिसांकडे तपासासाठी सोपविला आहे.

या प्रकरणी साक्षी रातुडी, तरन्नुम मलिक, रोहन सहगल, आशुतोष वर्मा आणि महाकृषी तिवारी ( सर्व रा. हरियाणा ) यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हरिरयाणामधील सिरसा जिल्ह्यातील एका महिलेने स्थानिक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार युवती वाघोलीतील एका संस्थेमध्ये शिक्षण घेत आहे. वाघोली भागात सदनिका भाडेतत्वावर घेऊन ती आरोपी साक्षी, तरन्नुम यांच्याबरोबर राहते. १७ नोव्हेंबर रोजी सदनिकेत चोरी झाली होती. त्या वेळी सदनिकेच्या मालकाने तक्रारदार युवतीवर संशय व्यक्त केल्याने तिने सदनिका सोडली. ती दुसऱ्या ठिकाणी राहण्यास गेली.

दरम्यान, साक्षी, तरन्नूम, रोहन, आशुतोष, महाकृषी यांनी युवतीला धमकावण्यास सुरुवात केली. युवतीचे कपडे उतरवून तिला मारहाण केली. या प्रकारचे त्यांनी मोबाइलद्वारे चित्रीकरण केले. युवतीच्या खात्यातील ८० हजार रुपये आरोपींनी स्वत:च्या खात्यात हस्तांतरित केले. त्यानंतर तिला आरोपी धमकावत होते. त्यामुळे युवती घाबरली आणि मूळगावी निघून गेली. तिने आई-वडिलांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर हरियाणा पोलिसांनी संबंधित गुन्हा तपासासाठी लोणीकंद पोलिसांकडे सोपविला. सहायक पोलीस निरीक्षक निखील पवार तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 17:32 IST

संबंधित बातम्या