पुणे : मुसळधार पावसामुळे शहरात पाच ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन झाडांच्या फांद्या हटवून रस्ते वाहतुकीस खुले करुन दिले.शहर, परिसरात मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास मुसळधार पाऊस पडण्यास सुरूवात झाली. मुसळधार पावसामुळे शहरातील वेगवेगळ्या भागात पाच ठिकाणी झाडे कोसळली.

शनिवार पेठ, उंड्री, लोहगाव, येरवडा, बिबवेवाडी परिसरात झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले आही. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यात पडलेल्या झाडांच्या फांद्या हटविल्या. फांद्या हटविल्यानंतर रस्ते वाहतुकीस खुले करुन दिली. तासभर झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील वेगवेगळ्या भागात पाणी साचले. अर्ध्या तासानंतर पावसाचा जोर कमी झाला. वसाहतीत पाणी शिरण्याच्या घटना घडल्या नाहीत, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पावसामुळे जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, सातारा रस्ता, शंकरशेठ रस्ता, हडपसर रस्ता, नगर रस्ता परिसरातील वाहतुकीचा वेग संथ झाला. मात्र, शहरात कोठेही वाहतूक विस्कळीत झाली नाही, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.