पुणे : नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड) रस्ता ते सातारा रस्ता, सहकारनगर परिसरातील वाहतुकीची कोंडी तसेच नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी नवीन पर्यायी मार्गाची चाचपणी सुरू आहे. हिंगणे ते खोराडवस्ती परिसरात डोंगरातून बोगदा तयार करण्याचे प्रस्तावित आहे. या मार्गाची महापौर मंजूषा नागपुरे यांनी पाहणी केली.
या परिसरात प्रस्तावित असलेला हा बोगदा पूर्ण झाल्यानंतर हिंगणे खुर्द ते सहकारनगर तसेच तळजाई परिसरातील दळणवळण अधिक सुलभ होण्यासोबतच नागरिकांचा वेळ व प्रवासाचे अंतर कमी करण्यास मोठी मदत होणार आहे. या प्रस्तावित मार्गाची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून या प्रकल्पाची व्यवहार्यता, तांत्रिक बाबी आणि आवश्यक उपाययोजनांबाबत महापौर नागपुरे यांनी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
पुणे महापालिकेचेया वेळी नगरसेवक प्रसन्न जगताप, ज्योती गोसावी, पुणे महापालिकेच्या प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता दिनकर गोजारे आदी उपस्थित होते. महापौर मंजुषा नागपुरे यांनी या भागात प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. हा मार्ग या भागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे सातारा रस्त्यावर जाण्यासाठी वाहनचालकांना होणारा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.
वाढते शहरीकरण आणि वाहनांची वाढत असलेली संख्या यामुळे शहरातील विविध भागांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या अधिकच बिकट होत चालली आहे. वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना तासनतास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. वाहनचालकांना तासनतास वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडावे लागते. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सकाळी कार्यालयात जाताना तसेच संध्याकाळी कार्यालयातून घरी येता नाही नागरिकांना वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागतो.
शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासोबतच नागरिकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी महापौर मंजूषा नागपुरे यांनी पुढाकार घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर हिंगणे-खोराड वस्ती येथील रस्ता रुंदीकरण करून तसेच नाल्यावर कल्व्हर्ट बांधून नाला बंदिस्त करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
एचसीएमटीआर तसेच रिंग रोडच्या कामाला वेग
शहरातील मध्यवर्ती भागासह विविध भागातून जाणारा एससीएमटीआर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. हा रस्ता प्रधान्य तयार करण्याबरोबरच शहराच्या आजूबाजूच्या भागातून जाणारा प्रस्तावित रिंग रोड चे काम मार्गी लावण्यासाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पुढाकार घेतला आहे. हे रस्ते तयार झाल्यास वाहतूक कोंडी मधून पुणेकरांची सुटका होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हे प्रकल्प कमीत कमी वेळेत मार्गी कसे लावता येईल यासाठी महापालिका प्रशासन विशेष प्रयत्नशील असल्याचे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
