पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतरच्या वर्षभरात वाहतूक पोलिसांकडून सहा हजार ६५८ मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मद्यपी वाहनचालकांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून वेळोवेळी नाकाबंदीही करण्यात येत आहे.

मद्यपींकडून वाहने भरधाव चालविली जात असल्याने गंभीर स्वरूपाचे अपघात घडतात. असे अपघात रोखण्यासाठी मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले होते. तसेच, अल्पवयीन मुलांना वाहने चालविण्यास देणाऱ्या पालकांविरुद्धही कारवाईचे आदेश त्यांनी दिले होते. ‘मे २०२४ ते एक मे २०२५ या कालावधीत वाहतूक पोलिसांनी ६ हजार ६५८ मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली. संबंधित वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्याचे प्रस्तावही वाहतूक पोलिसांनी प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठविले आहेत,’ अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अल्पवयीन चालकांवर कारवाई

वाहतूक पोलिसांनी अल्पवयीन वाहन चालकांवरील कारवाईही तीव्र केली आहे. पोलिसांनी ८२ अल्पवयीन दुचाकीस्वारांवर केली असून, गंभीर अपघात प्रकरणात मुलांना वाहने चालविण्यास देणाऱ्या आठ पालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.