पुणे : घर कामासाठी ठेवलेल्या कामगाराने कपाटातील हिरेजडीत दागिने आणि रोकड असा १७ लाख ७० हजारांचा ऐवज चोरल्याची घटना पाषाण परिसरात घडली. याबाबत एका महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा – राज्यातील धरणांत ९६५.३२ टीएमसी पाणीसाठा, जाणून घ्या कोणत्या विभागात किती पाणीसाठा

हेही वाचा – पुणे : मूकबधीर संस्थेच्या नावाने देणगी मागण्याच्या बहाण्याने सराफी पेढीत चोरी, साडेतेरा लाखांचे दागिने चोरून चोरटा पसार

तक्रारदार महिला पाषाण येथील सोमेश्वरवाडी भागात असलेल्या एका सोसायटीत राहायला आहेत. त्या व्यावसायिक आहेत. त्यांनी घरकामासाठी एकाला ठेवले होते. दोन वर्षांपासून तो महिलेच्या घरात काम करत होता. महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून कामगाराने कपाटातील हिरेजडीत सोन्याचे दागिने आणि रोकड असा १७ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. कामगार कामावर न आल्याने महिलेचा संशय बळावला. त्यांनी कपाटाची पाहणी केली. तेव्हा कपाटातील दागिने आणि रोकड चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील तपास करत आहेत.