पुणे : कोढव्यातील कौसरबागेत खरेदीसाठी गेलेल्या इराणी महिलेची पर्स चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली. पर्समध्ये १०० अमेरिकन डाॅलर, भारतीय चलन, तसेच सोन्याची अंगठी असा मुद्देमाल होता.

याबाबत एका ३२ वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिलांनी बुरधा परिधान केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील कौसरबाग परिसरात रजमानमित्त विविध वस्तुंची विक्री करणारे स्टाॅल लावण्यात आले आहेत. तक्रारदार महिला मूळची इराणची आहे.

 व्यावसायिकावर व्हिसावर ती भारतात आली असून, गेल्या दहा वर्षांपासून ते भारतात वास्तव्य करत आहेत. कोंढव्यातील कोणार्कपुरम सोसायटीत महिला राहायला आहे. २८ फेब्रुवारी महिला कोंढव्यातील काैसरबागेत असलेल्या नबाब मोहल्ला येथे खरेदीसाठी आली होती. एका स्टाॅलवर इराणी महिला थांबली होती. त्या वेळी बुरधा परिधान केलेल्या दोन महिला तेथे आल्या. इराणी महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून बुरधा परिधान केलेल्या दोन महिलांनी पर्स चोरुन नेली. पर्समध्ये १०० अमेरिकन डाॅलर, भारतीय चलन, सोन्याची अंगठी असा मुद्देमाल असल्याचे इराणी महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.

पसार झालेल्या महिलांचा शाेध घेण्यात येत असून, पोलिसांनी कौसरबाग परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पोलीस उपनिरीक्षक पंकज खोपडे तपास करत आहेत.