पुणे :शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी कोथरूड भागातील एका महिलेची ४७ लाख ६८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.

याबाबत एका महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कोथरूड भागात राहायला आहेत. सायबर चोरटयांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर फेब्रुवारी महिन्यात संदेश पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते. महिलेने सुरुवातीला चोरट्यांच्या खात्यात काही रक्कम जमा केली. चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यात परताव्यापोटी रक्कम जमा केली. परताव्याची रकम मिळाल्याने महिलेचा विश्वास बसला. त्यानंतर महिलेने गेल्या तीन ते चार महिन्यांत चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी रकम जमा केली. परतावा, तसेच गुंतविलेली रकम परत न देण्यात आल्याने महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विक्रमसिंह जाधव तपास करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विवाहाच्या आमिषाने तरुणीची फसवणूक

विवाहाच्या आमिषाने चोरट्यांनी आठ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका तरुणाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणी येरवडा भागात राहायला आहेत. एका विवाहविषयक संकेतस्थळावर तिची चोरट्याशी ओळख झाली होती. चोरट्याने तिला जाळ्यात ओढले. त्यानंतर पुण्यात तरुणीला भेटायला येणार आहे, अशी बतावणी चोरट्याने केली. बेकायदा काळ्या पैसे व्यवहारात पुणे विमानतळावर पकडण्यात आले असून, कारवाई न होण्यासाठी तातडीने पैसे जमा करावे लागणार आहेत, असे त्याने सांगितले. त्यानंतर तरुणीने त्याच्या बँक खात्यात वेळोवेळी आठ लाख ३५ हजार रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवकाते तपास करत आहेत.