पुणे : वैमनस्यातून टोळक्याने कोयते उगारून वाहनांची तोडफोड केल्याची घटना लोणी काळभोर भागात घडली. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरुन गुन्हे दाखल करण्यात आले.

रवींद्र साहेबराव झेंडे (वय ४० ,रा. इंदिरानगर, कदमवाक वस्ती, लोणी काळभोर) यांनी याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी अविनाश कामठे, प्रसाद जेठीथोर, अक्षय पवार, गणेश घोडसे, शुभम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र झेंडे यांचे आरोपी अविनाश कामठे यांच्याशी वाद झाले होते. वादातून अविनाश आणि साथीदार झेंडे यांच्या घरासमोर रविवारी दुपारी एकच्या सुमारास आले. त्यांनी कोयते उगारून दहशत माजविली. झेंडे आणि त्यांच्या साडूच्या दुचाकीची तोडफोड करून दहशत माजविली. तुम्हाला आणि तुमच्या मुलाला जीवे मारून टाकतो, अशी धमकी आरोपींनी दिली, असे झेंडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करत आहेत.

हेही वाचा – पुणे : उत्तर प्रदेशातील दशहरी आंब्यांची भूरळ, फळबाजारात दररोज १२ टन आवक

हेही वाचा – पुण्यात चोरट्यांचा धूमाकूळ; पोलिसांनी गस्त वाढवूनही चोरीचे प्रकार सुरूच

याप्रकरणात राणी महादेव कामठे (वय ४५, रा. खैरे वस्ती, लोणी काळभोर) यांनी परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी चंद्रशेखर उर्फ पिल्या चोरमले, किरण अण्णा चव्हाण, आशिष झेंडे, रोहित पाटील, यश जैन (सर्व रा. लोणी काळभोर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी रविवारी रात्री कामठे यांच्या घरासमोर आले. कामठे यांचा मुलगा अविनाशचा मित्र प्रेम शेट्टी याच्या दुचाकीची तोडफोड केली. कामठे यांच्या घराच्या दरवाज्यावर कोयते आपटले. तुमच्या मुलाचा खून आम्ही करणार, अशी धमकी देऊन आरोपी पसार झाले, असे कामठे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार कुंभार तपास करत आहेत.