scorecardresearch

पुण्यात प्रेमी युगुलाची खाणीत उडी मारून आत्महत्या

विश्रांतवाडी परिसरात हळहळ

पुण्यात प्रेमी युगुलाची खाणीत उडी मारून आत्महत्या
प्रातिनिधीक छायाचित्र

पुण्यातील विश्रांतवाडी भागातील धानोरी येथील खाणीमध्ये प्रेमी युगालाची उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली असून ही आत्महत्या प्रेम प्रकरणातून झाल्याचा अंदाज विश्रांतवाडी पोलिसांनी व्यक्त केला. शीतल दत्तू गायकवाड आणि सनी अमोल जगताप अशी या प्रेमीयुगुलाचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विश्रांतवाडी भागातील गांधीनगर येथे राहणारी 22 वर्षांची शीतल दत्तू गायकवाड मूळची सोलापूर इथली आहे. ती गेले काही दिवस मावशीकड़े रहायला आली होती. तिचा प्रियकर सनी अमोल जगताप हा 28 वर्षांचा होता आणि वडारवस्ती इथे राहायला होता.विमाननगर इथल्या एका खासगी कंपनीत कामाच्या निमित्ताने शीतल आणि सनी यांची ओळख झाली त्यांच्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले.

सोमवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास कामाला जाते असे घरी मावशीला सांगत शीतल घराबाहेर पडली. तिने घराबाहेर सनीची भेट घेतली आणि त्यानंतर शितल आणि सनी यांनी धानोरी येथील खाणीमध्ये उडी मारुन आत्महत्या केली.या दोघांचे मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे नागरिकांना दिसताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. तर या दोघांचे मृतदेह अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने काढण्यात आले आहे.तसेच या प्रकरणाचा आधिक तपास करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-07-2017 at 19:23 IST

संबंधित बातम्या