पुणे : .युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत असल्याने शहरातील अनेक उपाहारगृह चालक, खाणावळ चालकांनी व्यवसाय तात्पुरता बंद केला आहे. गॅसचा तुटवडा जाणवत असल्याने व्यवसायावर परिणाम झाला आहे. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारातून उपाहारगृह चालक, खाणावळ चालकांना भाजीपाल्याचा पुरवठा केला जातो. भाजीपाल्याच्या मागणीत ३० ते ४० टक्क्यांनी घट झाल्याचे निरीक्षक मार्केट यार्डातील भाजीपाला विक्रेत्यांनी नोंदविले आहे. घाऊक बाजराात भाजीपाला शिल्लक राहत असल्याने दरातही १० ते २० टक्क्यांनी घट झाली आहे.

शहरातील उपाहारगृह चालक, खाणावळ चालक,केटरिंग व्यावसायिक तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांना मार्केट यार्डातील घाऊक बाजरातून भाजीपाल्याचा पुरवठा केला जातो. दररोज भाजीपाला खरेदी करुन उपाहारृह चालकांकडे पोहचविला जातो. काही जण स्वत:हून जाऊन भाजीपाला खरेदी करतात. मात्र, आखातातील युद्धाानंतर घरगुती, तसेच व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरच्या वितरणावर परिणाम झाला आहे. सिलिंडरचा तुटवडा जाणवत असल्याने अनेकांनी सध्या उपाहारगृह, खाणावळी बंद केल्या आहेत. साठवणुकीतील सिलिंडरचा साठा संपत आला आहे.

‘मार्केट यार्डातील घाऊक बाजराातून भाजीपाला खरेदीत घट झाली आहे. भाजीपाला शिल्लक राहत आहे. किरकोळ बाजारातील व्यापाऱ्यांकडून भाजीपाला खरेदी कमी प्रमाणावर केली जात आहे. त्यामुळे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात भाजीपाला शिल्लक राहत आहे. मार्केट यार्डातील घाऊक भाजीपाला बाजराात रविवारी सर्वाधिक आवक होते.

सोमवार ते गुरुवार या कालावधीत साधारणपणे राज्य तसेच परराज्यातून मिळून भाजाीपाल्याची आवक होते. शुक्रवारी आणि रविवारी साधारणपणे ९० ते १०० ट्रक भाजीपााल्याची आवक होते. गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे भाजीपाला खरेदीवर परिणाम झाला आहे. मागणीत ३० ते ४० टक्क्यांनी घट झाली आहे. येत्या दोन ते तीन दिवसात सिलिंडरचा पुरवठा सुरळीत न झाल्यास भाजीपाल्याच्या मागणीत ५० टक्के घट होईल, तसेच दरातही घट होईल’, अशी शक्यता श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी व्यक्त केली.

नाशवंत मालाची मिळेल त्या दरात विक्री

‘भाजीपाल्यासह पालेभाज्यांच्या मागणीत घट झाली आहे. पालेभाज्या नाशवंत असल्यो दररोज विक्री करण्याशिवाय पर्याय नाही. मिळेल त्या दरात भाजीपाला, पालेभाज्यांची विक्री केली जात आहे. मागणी घटल्याने अडते, किरकोळ विक्रेते, शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान साेसावे लागत आहे’, असे मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी नमूद केले.

फळांच्या मागणीत घट उपाहारगृह चालकांकडून अननस, संत्री, मोसंबी, चिकू, डाळिंब, पपई, द्राक्षे, सफरचंद या फळांना मागणी असते. सिलिंडरच्या तुटवडा निर्माण झाल्याने उपाहारगृह चालकांनी तात्पुरते व्यवसाय बंद केला आहे. फळांच्या मागणीत घट झाली असल्याचे मार्केट यार्डातील फळ व्यापारी युवराज काची यांनी सांगितले.