पुणे : अवकाळी पावसामुळे फळभाज्यांचे नुकसान झाले. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक कमी झाली. मागणी नसल्याने वांगी, भेंडी, हिरवी मिरचीच्या दरात ५ ते १० टक्क्यांनी घट झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
गुलटेकडीतील घाऊक बाजारात रविवारी राज्य, तसेच परराज्यातून ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशातून १५ ते १६ टेम्पो हिरवी मिरची,इंदूर आणि राजस्थानातून मिळून ६ ते ७ टेम्पो गाजर, कर्नाटकातून ५ ते ६ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून ४ ते ५ टेम्पो शेवगा, कर्नाटक, तामिळनाडूतून ५ ते ६ टेम्पो तोतापुरी कैरी, कर्नाटकातून २ ते ३ टेम्पो घेवडा, २ ते ३ टेम्पो पावटा, कर्नाटक, गुजरातमधून प्रत्येकी ५ ते ६ टेम्पो भुईमूग शेंग, मध्य प्रदेशातून १० ते १२ टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.
पुणे विभागातून ५०० ते ६०० गोणी सातारी आले, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ३ ते ४ टेम्पो, टोमॅटो ८ ते १० हजार पेटी, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, काकडी ७ ते ८ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, गाजर ५ ते ६ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, घेवडा ४ ते ५ टेम्पाे, पावटा २ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, गाजर ५ ते ६ टेम्पो, शेवगा ३ ते ४ टेम्पो, कांदा ७० ते ८० टेम्पो, तसेच पारनेरहून ८ ते १० टेम्पो मटार अशी आवक झाली. तसेच, इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा ४० ते ४२ टेम्पो अशी आवक झाली.
पालेभाज्यांचे दर स्थिर
मार्केट यार्डातील तरकारी विभागात सर्व प्रकारच्या पालेभाज्यांची आवक चांगली झाली. बहुतांश पालेभाज्यांचे दर स्थिर राहिले, अशी माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली. कोथिंबीर एक लाख २५ हजार जुडी, तसेच मेथीच्या ६० हजार जुडींची आवक झाली. पालेभाज्यांचे दर (शेकडा जुडी) – कोथिंबीर – ८०० ते १५००, मेथी – ८०० ते १२००, शेपू – ७०० ते १०००, कांदापात – ८०० ते १५००, चाकवत – ५०० ते ७००, करडई- ४०० ते ७००, पुदिना – ५०० ते ८००, अंबाडी – ४०० ते ७००, मुळे – ८०० ते १५००, राजगिरा – ४०० ते ७००, चुका- ८०० ते १०००, चवळई – ४०० ते ७००, पालक -८०० ते १५००
डाळिंबाच्या दरात घट
बाजारात कच्च्या डाळिंबाची मोठ्या प्रमाणावर आवक झाली. डाळिंबाच्या दरात १० टक्क्यांनी घट झाली. पावसामुळे लिंबाची आवक आवक कमी झाले. हापूस आंब्याची आवक अद्याप वाढली नाही. त्यामुळे आंब्याचे दर तेजीत आहेत. पेरूच्या दरात घट झाली आहे. कलिंगड, खरबूज, द्राक्षे, माेसंबी, संत्री या फळांचे दर स्थिर असल्याची महिती व्यापाऱ्यांनी दिली. मोसंबी ३० ते ४० टन, संत्री २ टन, डाळिंब १५ ते १८ टन, पपई १५ ते २० टेम्पो, लिंबे ७०० ते ८०० गोणी, कलिंगड ३५ ते ४० टन, खरबूज २० ते २५ टन, चिकू दोन हजार गोणी, पेरू १०० ते १५० प्लास्टिक जाळी, (क्रेट्स), अननस ६ ट्रक, तसेच हापूस आंब्याच्या दीड ते दोन हजार पेटी अशी आवक झाली.
