पुणे : मार्केट यार्डातील घाऊक बाजारात आवक कमी झाल्याने सर्व प्रकारच्या फळभाज्यांच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत १० टक्क्यांनी वाढ झाली. गुलटेकडीतील घाऊक बाजारात रविवारी राज्य, तसेच परराज्यातून ८५ ते ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक कमी झाली असून, सर्व प्रकारच्या फळभाज्यांच्या दरात १० टक्क्यांनी वाढ झाली.

कर्नाटक, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेशातून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, राजस्थानातून २ ते ४ टेम्पो गाजर, कर्नाटकातून २ ते ३ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून ४ ते ५ टेम्पो शेवगा, कर्नाटक, तामिळनाडूतून १टेम्पो तोतापुरी कैरी, कर्नाटकातून २ ते ३ टेम्पो घेवडा, २ टेम्पो पावटा, कर्नाटक, गुजरातमधून प्रत्येकी २ टेम्पो भुईमूग शेंग, राजस्थान, मध्य प्रदेशातून मिळून २ ते ३ टेम्पो मटार, तसेच मध्य प्रदेशातून ८ ते १० टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

पुणे विभागातून २६० गोणी सातारी आले, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ४ ते ५ टेम्पो, टोमॅटो ८ ते १० हजार पेटी, हिरवी मिरची २ ते ३ टेम्पो, काकडी ५ ते ६ टेम्पो, फ्लॉवर ८ ते १० टेम्पो, गाजर २ ते ३ टेम्पो, कोबी ४ ते ५ टेम्पो, पावटा २ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, गाजर २ ते ३ टेम्पो, नवीन आणि जुना कांदा मिळून १२० टेम्पो अशी आवक झाली. तसेच इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा २५ ते ३० टेम्पो अशी आवक झाली.

पालेभाज्यांच्या दरात वाढ

मार्केट यार्डातील तरकारी विभागात गेल्या आठवड्याच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक कमी झाली. सर्व प्रकारच्या पालेभाज्यांच्या दरात १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली, अशी माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली. पुणे विभागातून कोथिंबिरीच्या दीड लाख जुडी, मेथीच्या ६० हजार, तसेच ४ ते ५ हजार हरभरा गड्डीची आवक झाली. पालेभाज्यांचे दर (शेकडा जुडी) – कोथिंबीर – ६०० ते १५००, मेथी – १००० ते १५००, शेपू – ८०० ते १२००, कांदापात – ८०० ते १५००, चाकवत – ७०० ते ८००, करडई- ५०० ते ८००, पुदिना – ३०० ते ६००, अंबाडी – ४०० ते ७००, मुळे – ८०० ते १५००, राजगिरा – ४०० ते ७००, चुका- ८०० ते १२००, चवळई – ५०० ते ८००, पालक – १००० ते १५००, हरभरा गड्डी – ८०० ते १५००.

कलिंगड, खरबूज, पपई, चिकूच्या दरात घट रमजान महिन्यात फळांची आवक वाढली आहे. कलिंगड, खरबूज, पपई, चिकूच्या दरात किलोमागे ४ ते ५ रुपयांनी घट झाली. डाळिंबाची आवक कमी झाली आहे. मात्र, मागणी नसल्याने डाळिंबांचे दर स्थिर आहेत. उन्हाचा चटका वाढल्याने लिंबांच्या मागणीत वाढ झाली आहे. लिंबाच्या १५ ते २० किलो गाेणीच्या दरात २०० ते ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. फळबाजारात मोसंबी ३० ते ४० टन, संत्री २० ते २५ टन, डाळिंब २० ते २८ टन, पपई १० ते १५ टेम्पो, लिंबे १२०० ते १४०० गोणी, कलिंगड १०० टन, खरबूज ५० टन,, चिकू २० टन, पेरू ५०० ते ६०० प्लास्टिक जाळी, अननस ६ ट्रक, स्ट्राॅबेरी १ ते २ टन, द्राक्षे ३० ते ४० टन अशी आवक झाली.