भारती विद्यापीठातील आयुर्वेद महाविद्यालयात एमडीच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या तरुणीने हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ८ वाजता उघडकीस आली. या घटनेने महाविद्यालयाच्या परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेचा अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठातील आयुर्वेद महाविद्यालयात एमडीच्या पहिल्या वर्षात प्रियंका देविदास भालेराव (वय २६, सध्या रा. पीजी गर्लस हॉस्टेल, भारती विद्यापीठ, पुणे, मूळ परभणी) ही शिक्षण घेत होती. तिच्या रूममधील काही मैत्रिणी आज सकाळी क्लासवरून आल्यावर त्यांनी तिचा दरवाजा ठोठाविला. परंतु आतून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न दिल्याने खिडकीमधून आत पाहिल्यावर प्रियांकाने गळफास घेतल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाची धाव घेतली. मात्र तिथे कोणत्याही प्रकारची सुसाईड नोट सापडली नाही. तसेच काही व्यक्तीशी चौकशीही केली. पण आत्महत्येचे कारण समजू शकले नसल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांनी सांगितली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune md student suicide in hostel crime bharti vidyapeeth
First published on: 20-03-2017 at 20:12 IST