मेट्रो मार्गिकेची खांब उभारणी वेगात ; आतापर्यंत दहा हजार ५४९ चौरस मीटर क्षेत्रातील काम पूर्ण

हिंजवडी येथील उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांच्या (हाय टेन्शन लाईन्स) स्थलांतराचेही काम वेगाने करण्यात येत आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचे काम वेगाने सुरू आहे. हिंजवडी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रस्त्यावर मेट्रोचे दहा खांब उभारण्यात आले आहेत.

पुणे : हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार हिंजवडी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रस्त्यावर मेट्रोचे दहा खांब उभारण्यात आले असून या कामाला वेग आला आहे. आतापर्यंत दहा हजार ५४९ चौरस मीटरचे बॅरिकेिडगचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

ही मेट्रो मार्गिका सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर करण्यात येत आहे. टाटा समूहाची विशेष वहन कंपनी असलेल्या पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड (पीआयसीटीएमआरएल) आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्या वतीने २३ किलोमीटर लांबीच्या मार्गावर सुरू असलेल्या या प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे. आतापर्यंत तब्बल दहा हजार ५४९ चौरस मीटरचे बॅरिकेिडगचे काम पूर्ण झाले आहे. या शिवाय विद्यापीठ रस्ता आणि हिंजवडी येथे खांब उभारणीचे काम सुरू आहे. विद्यापीठ रस्त्यावरील ई-स्क्वेअरच्या समोर आणि हिंजवडी येथील हॉटेल विवांताच्या समोर या खांबांची बांधणी केली जात आहे. एकूण दहा खांबांची उभारणी पूर्ण झाली असून, येत्या काही दिवसांत हा आकडा वाढविण्याचा पीआयसीटीएमआरएलचा मानस आहे. हे खांब प्रत्यक्ष पूल बांधणीसाठी उभारले जात आहेत. या शिवाय स्थानकासाठी बनवल्या जाणाऱ्या खांबांची एकूण संख्या आता ४१ झाली आहे. 

हिंजवडी येथील उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांच्या (हाय टेन्शन लाईन्स) स्थलांतराचेही काम वेगाने करण्यात येत आहे. सध्या सव्वाआठ किलोमीटर वाहिन्या स्थलांतराचे काम पूर्ण झाले असून आता फक्त शेवटचे साडेचारशे मीटर अंतराच्या वाहिन्यांचे स्थलांतर करण्याचे काम बाकी आहे. त्याखेरीज चार खांबांची आच्छादन काढून टाकण्याची प्रक्रिया (डिसमेंटलींग प्रोसेस) केवळ चार दिवसात पूर्ण करण्यात आली आहे.

प्रकल्पाचा आढावा

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प हिंजवडी या माहिती तंत्रज्ञान परिसराला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती केंद्राशी जोडणारा २३ किलोमीटरचा उन्नत मेट्रो रेल्वे प्रकल्प आहे. हा सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रकल्प आहे. हा प्रकल्प पीएमआरडीएद्वारे टाटा समूहाच्या ट्रिल अर्बन ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड आणि सिमेन्स प्रोजेक्ट व्हेंचर्स यांचा समावेश असलेल्या कन्सोर्टियमला देण्यात आला आहे. हा प्रकल्प आरेखन, बांधणी, निधी, कार्यान्वयन आणि हस्तांतरण (डिझाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सफर – डीबीएफओटी) तत्त्वावर पुणे आयटीसिटी मेट्रो रेल लिमिटेड या विशेष उद्देश कंपनीद्वारे ३५ वर्षांच्या सवलतीच्या कालावधीसाठी विकसित आणि चालवण्यासाठी देण्यात आला आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune metro work on hinjewadi to shivajinagar metro line is in full swing zws

Next Story
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावात विकास प्रकल्प ; दहा वर्षांच्या कामांचा नियोजनबद्ध आराखडा
फोटो गॅलरी