पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अखेर पुणेकरांसाठी मेट्रो सेवा सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रो रेल्वेचा लोकार्पण सोहळा पार पडला आहे. उद्घाटनांतर  पुणेकरांना मेट्रोने प्रवास करता येणार आहे. सहा मार्चला दुपारी तीन ते रात्री नऊ या वेळेत पुणे आणि पिंपरीतील दोन्ही मार्गिकांवर मेट्रोची सेवा नागरिकांसाठी खुली करण्यात येणार आहे. तसेच सोमवारपासून पुणेकरांना दररोज सकाळी आठ ते रात्री नऊदरम्यान मेट्रोतून प्रवास करता येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरातील दोन मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन करणार पार पडले. मोदींच्या हस्ते दोन मेट्रो मार्गांचे उद्घाटन झाल्यानंतर या मार्गांवरील मेट्रो प्रवाशांसाठी उपलब्ध झाली आहे. त्यातील एक वनाझ ते रामवाडी हा मार्ग १३ किलोमीटरचा असून त्यापैकी वनाझ ते गरवारे हा पाच किलोमीटरचा मार्ग तयार झाला आहे. याच मार्गाचे उद्या उद्घाटन मोदींच्या हस्ते पार पडले. तर पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट हा मार्ग १२ किलोमीटरचा असून त्यापैकी पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी या सात किलोमीटरचे काम पूर्ण झालं आहे. पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी या मार्गाचेही उद्घाटन पार पडणार आहे.

सकाळी आठ ते रात्री नऊपर्यंत करता येणार प्रवास

उद्घाटनानंतर या मार्गांवरील मेट्रो प्रवाशांसाठी उपलब्ध झाली आहे. सकाळी आठ ते रात्री नऊ पर्यंत मेट्रोने प्रवास करता येणार आहे. पुण्यात वनाझ ते रामवाडी दरम्यान पाच मेट्रो स्टेशनवर प्रवास करताना पहिल्या तीन स्टेशनसाठी दहा रुपये मोजावे लागतील तर पुढच्या दोन स्टेशनपर्यंत देखील प्रवास करायचा असेल तर आणखी दहा रुपये मोजावे लागतील. वनाझ या पहिल्या स्टेशनपासून गरवारेच्या पाचव्या स्टेशनपर्यंत प्रवास करण्यासाठी वीस रुपये मोजावे लागतील.

पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी या सात किलोमीटरच्या मार्गासाठी देखील वीस रुपये तिकीट आहे. या दोन्ही मेट्रो तीन डब्यांच्या आहेत आणि प्रत्येक डब्यात ३२५ प्रवाश्यांना प्रवास करण्याची क्षमता आहे. तीन डब्यांमधील एक डबा महिलांसाठी राखीव आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune metros tariff plan ticket price abn
First published on: 06-03-2022 at 12:11 IST