महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) राबवण्यात आलेल्या भरती प्रक्रियेचा निकाल जाहीर करण्यात आला. या भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले होते. मात्र आता निकाल आणि निवड जाहीर झाल्याने उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.म्हाडा सरळसेवा भरती २०२१ अंतर्गत १४ तांत्रिक आणि अतांत्रिक संवर्गातील ५६५ पदांसाठीची भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आली. त्यानुसार जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये परीक्षा घेण्यात आली. मात्र या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत एमपीएससी समन्वय समितीने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी केलेल्या तपासात गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे पुनर्परीक्षा घेण्याची वेळ म्हाडावर आली. मात्र परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार याची उमेदवारांना प्रतीक्षा होती. या पार्श्वभूमीवर निकाल जाहीर करण्यात आला.

हेही वाचा >>> पिंपरी : ‘रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी महामंडळाची स्थापना करावी’

mining projects in sindhudurg
सिंधुदुर्गातील खनिज प्रकल्प कायमचे बंद व्हावेत; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पर्यावरणवाद्यांना अपेक्षा
State Tax Inspector Exam Final Result declared by MPSC
राज्य कर निरीक्षक परीक्षेचा अंतिम निकाल एमपीएससीकडून जाहीर
mhada lottery pune , mhada pune marathi news
खुषखबर… म्हाडा लॉटरीला मुदतवाढ, १०० घरेही वाढली
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?

निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जात वैधता प्रमाणपत्र, उमेदवारांनी समांतर आरक्षणाअंतर्गत सादर केलेली प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्र आणि शैक्षणिक प्रमाणपत्र पडताळणीच्या अधीन राहून जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे ही यादी तात्पुरत्या स्वरुपाची असल्याचेही नमूद करण्यात आले.

म्हाडाच्या भरती परीक्षेत गैरप्रकार झाल्याची तक्रार दाखल केली होती. गैरप्रकारामध्ये ६३ उमेदवारांचा समावेश असल्याचे तपासाअंती उघडकीस आले. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही म्हाडाने केली पाहिजे. आता निवड यादीतील उमेदवारांची पडताळणी करून अंतिम यादी जाहीर होईल. मात्र प्रामाणिक उमेदवारांना न्याय मिळाला हे महत्त्वाचे आहे.- नीलेश गायकवाड, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती