scorecardresearch

पुणे महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन पथकाला थकबाकीदाराकडून शिवीगाळ..!

कर आकारणीची अंमलबजावणी करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन पथकाला शिवीगाळ करून धमकी दिली.

Pune mnc tax collection team insulted
पुणे महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन पथकाला थकबाकीदाराकडून शिवीगाळ..! (संग्रहित छायाचित्र)

पुणे : कर आकारणीची अंमलबजावणी करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन पथकाला शिवीगाळ करून धमकी दिली. अधिकाऱ्याची कॉलर पकडून त्यांचा शर्ट फाडला. तर, चिटकवलेली जप्ती वारंटची नोटीसदेखील फाडून सरकारी कामात अडथळा आणल्याचा प्रकार घडला.

हेही वाचा – पुण्याचे पाणी जलसंपदाकडून पाण्यात; मुंढवा जॅकवेल प्रकल्पातील प्रक्रिया केलेले पाणी उचलण्यात अपयश

हेही वाचा – शाळांतून आता खिचडी हद्दपार, नव्या पाककृतींचा पोषण आहार; नव्या पाककृती सुचवण्यासाठी तज्ज्ञांची समिती

याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात राजेश वाघचौरे (वय ४९, रा. कोरेगाव पार्क) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, रफिक शेख (वय ४५) याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा प्रकार उंड्री रस्त्यावरील मॅजिस्टीक व्हीला येथे बुधवारी सकाळी साडेआकराच्या सुमारास घडला. तक्रारदार हे महापालिकेत कर आकारणी व कर संकलन विभागात निरीक्षक आहेत. दरम्यान, ते जप्ती वारंटची अंमलबजावणी करण्यासाठी पथकासह उंड्री परिसरात गेले होते. त्यावेळी त्यांनी रफिक शेख यांच्या घरावर जप्ती वारंटची नोटीस चिटकवण्याचा प्रयत्न केला असता त्याने या पथकाशी हुज्जत घालून त्यांना शिवीगाळ केली. तसेच, तक्रारदार यांच्या शर्टची कॉलर पकडून त्यांच्या शर्टचे बटन तोडले. त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. तर, शिवीगाळ करून धमकावले. पथकाने मुख्य दरवाजाला लावलेली वांरट जप्तची नोटीस फाडून टाकण्यास सांगितल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-03-2023 at 16:30 IST
ताज्या बातम्या