कोथरुडमध्ये दहशत माजविणारा गुंड दीनानाथ उर्फ सोन्या पवार आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले.

या प्रकरणी दीनानाथ उर्फ सोन्या गोरक्षनाथ पवार (वय २२, एक्स सर्व्हिसमन कॉलनी, चाळ क्रमांक ५, शास्त्रीनगर, कोथरूड), अक्षय उर्फ ज्वाला शांताराम येवले (वय २३, रा. सुतारदरा, कोथरूड), प्रदीप उर्फ पद्या भोला मिर्धा (वय १९, रा. सूस गाव, ता. मुळशी) तसेच त्यांच्या टोळीतील एका अल्पवयीन मुलाविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

narendra modi
धर्माच्या आधारावर आरक्षणाचा प्रयत्न! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर आरोप
pune, Young Man Arrested, Raping College Girl, Threatening with girl obscne Video, Pune Police Investigate, girl attempted suicide, crime in pune, pune news,
धक्कादायक : मोबाइलवर चित्रफीत काढून महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार; तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न
hotel owner attempts suicide in front of police station
हॉटेल व्यावसायिकाचा पोलीस ठाण्यासमोर आत्महत्येचा प्रयत्न; काय आहे प्रकार?
india bloc, india bloc rally
जागावाटपावरून मतभेद, तरीही व्यासपीठावर एकत्र; ‘इंडिया’ आघाडीकडून एकजूट दाखवण्याचा प्रयत्न?

पवार आणि साथीदारांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न, दुचाकी तोडफोड, बेकायदा शस्त्र बाळगणे, दरोड्याचा प्रयत्न असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. पवार आणि साथीदारांच्या विरोधात पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. मात्र, त्यांच्या वर्तनात सुधारण झाली नव्हती.

पवार आणि साथीदारांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी तयार केला होता. पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. त्यानंतर पवार आणि साथीदारांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्यास मंजुरी देण्यात आली. गेल्या सात महिन्यात शहरातील २६ गुंड टोळ्यांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे.