पुणे : आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शिवसेनेचे (शिंदे) खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भेट दिली. या वेळी आंदोलकांकडून पक्षांतराच्या मुद्यावरून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच ‘उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोन लावा,’ अशी मागणीही गर्दीतून करण्यात आली

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आंदोलनस्थळी आल्याचे स्पष्टीकरण खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडून देण्यात आले. रविवारी रात्री उशिरा त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

‘‘एमपीएससी’च्या अध्यक्षांचा राजीनामा कोणाला घेता येतो?’ असा सवालही निंबाळकर यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, ‘आता दोन ठिकाणी आंदोलन सुरू आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी इथे आलो आहे.

आंदोलक विद्यार्थ्यांना नेमके काय अपेक्षित आहे, हे समजून त्यांच्या मागण्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहे,’ असे आश्वासन शिवसेनेचे (शिंदे) खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिले.

आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला निंबाळकर यांनी भेट दिली. या वेळी आंदोलकांकडून पक्षांतराच्या मुद्यासह घोषणाबाजी करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोन लावा, आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा मागा, अशी मागणी गर्दीतून करण्यात आली.

‘लोकप्रतिनिधीने पाच वर्ष मेहनत घेतलेली असते. प्रामाणिकपणे, इमानदारीने निवडणूक लढवलेली असते. त्या लोकप्रतिनिधीला पुन्हा लढ म्हटल्यानंतर जितक्या यातना होतात, त्यापेक्षा तुमच्या यातना कितीतरी पटीने अधिक आहेत. पेपरफूटीसारखे पाप करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. अत्यंत संघर्षात ही पोरं अभ्यास करत असतात. अशा परिस्थितीत पेपर रद्द झाला, तर त्यांच्या यातना मी समजू शकतो,’ असे ओमराजे निंबाळकर म्हणाले.

दरम्यान, विद्यार्थ्यांनी ओमराजेंसमोर घोषणाबाजी करायला सुरुवात केली. त्यानंतर ‘तुम्हाला पाठिंबा द्यायला आलो, चुकलं का? तुमचे विषय मांडायला आलोय, ही चूक झाली का?’ अशा शब्दांत ओमराजेंनी संताप व्यक्त केला. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोन लावा, राजीनामा मागायचा आहे, अशा मागण्या गर्दीतून करण्यात आल्या.

मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार

“एमपीएससी’च्या अध्यक्षांचा राजीनामा कोणाला घेता येतो? आता दोन ठिकाणी आंदोलन सुरू आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी इथे आलो आहे. आंदोलक विद्यार्थ्यांना नेमके काय अपेक्षित आहे, हे समजून त्यांच्या मागण्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहे,’ असे आश्वासन शिवसेनेचे (शिंदे) खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिले.