पुणे : लोणावळा – कर्जत रेल्वे मार्गावर दरड कोसळल्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून रेल्वे वाहतूक विस्कळीत असून, १७ जुलैपर्यंत पुणे-मुंबई, दक्षिण भारत आणि उत्तर भारताकडे जाणाऱ्या २७ गाड्या पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.सोमवारी (६ जुलै) मुसळधार पावसामुळे लोणावळा-कर्जत रेल्वे मार्गावर दरड कोसळली. त्यामुळे पुणे-मुंबईसह गुजरात, राजस्थान, दक्षिण भारत आणि उत्तर भारताकडे जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. तर, अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. काही गाड्या अंशतः रद्द आणि काही गाड्या दुसऱ्या स्थानकांवरून सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून, पुणे-मुंबई दरम्यान दररोज प्रवास करणाऱ्यांचे हाल झाले आहेत.

पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या इंटरसिटी एक्सप्रेस, डेक्कन एक्सप्रेस, उत्तर भारतातील गोरखपूर, जोधपूर, इंदौरकडे जाणाऱ्या गाड्या, दक्षिण भारतातील हुबळी, हैद्राबाद, चैन्नई या गाड्यांसह कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस आदी ३० गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. आता शनिवारपासून (११ जुलै) १७ जुलैपर्यंत दक्षिण भारत-उत्तर भारताकडे जाणाऱ्या तब्बल २७ गाड्या पर्ययी मार्गाने वळविण्यात येणार असून, काही गाड्या अशंतः रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय काही गाड्या दुसऱ्या स्थानकांवरून सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

रेल्वे मार्ग पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे. रेल्वे सेवा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. गाड्यांच्या माहितीसाठी रेल्वे हेल्पलाइनवर, एनटीइएस ॲपवर संपर्क करावा, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.

दौंड – मनमाड – इगतपुरी – कल्याण मार्गे वळवण्यात आलेल्या गाड्या

  • विशाखापट्टणम-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस,
  • मदुरई -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
  • कराईकल-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस या गाड्या आहेत.

दौंड – मनमाड – जळगाव – पाळधी – सुरत मार्गे वळवण्यात आलेल्या गाड्या

  • एमजीआर चेन्नई – एकतानगर एक्सप्रेस
  • कोईम्बतूर – राजकोट एक्सप्रेस,
  • सिकंदराबाद – राजकोट एक्सप्रेस,
  • तिरुचिरापल्ली – अहमदाबाद एक्सप्रेस,
  • एमजीआर चेन्नई – अहमदाबाद एक्सप्रेस,
  • दौंड – ग्वाल्हेर एक्सप्रेस,
  • एमजीआर चेन्नई – अहमदाबाद एक्सप्रेस,
  • सिकंदराबाद – पोरबंदर एक्सप्रेस,
  • सोलापूर – अजमेर एक्सप्रेस

मनमाड – दौंड कॉर्ड लाईनमार्गे वळवण्यात आलेल्या गाड्या

  • संत्रागाछी – पुणे एक्सप्रेस

कल्याण – मनमाड – दौंड – सोलापूर मार्गे वळवण्यात आलेल्या गाड्या

  • लोकमान्य टिळक टर्मिनस – कराईकल एक्सप्रेस
  • लोकमान्य टिळक टर्मिनस – विशाखापट्टणम एक्सप्रेस
  • लोकमान्य टिळक टर्मिनस – मदुराई एक्सप्रेस

सुरत – पाळधी – मनमाड – दौंड – सोलापूर मार्गे वळवण्यात आलेल्या गाड्या

  • अहमदाबाद – एमजीआर चेन्नई एक्सप्रेस
  • राजकोट – कोइम्बतूर एक्सप्रेस
  • अहमदाबाद – एमजीआर चेन्नई एक्सप्रेस
  • राजकोट – सिकंदराबाद एक्सप्रेस
  • पोरबंदर – सिकंदराबाद एक्सप्रेस
  • एकता नगर – एमजीआर चेन्नई एक्सप्रेस
  • अहमदाबाद – तिरुचिरापल्ली एक्सप्रेस

सुरत – पाळधी – मनमाड – दौंड मार्गे वळवण्यात आलेल्या गाड्या

  • ग्वाल्हेर – दौंड एक्सप्रेस
  • अजमेर – सोलापूर एक्सप्रेस
  • अजमेर – दौंड एक्सप्रेस

दौंड कॉर्ड लाइन – मनमाड – भुसावळ मार्गे वळवण्यात आलेली गाडी

  • पुणे – संतरागाछी एक्सप्रेस

पुण्यात थांबविण्यात येणाऱ्या गाड्या

खडकीत थांबिण्यात येणाऱ्या गाड्या

  • केएसआर बेंगळुरू – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
  • कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस

पुण्यातून सोडण्यात येणाऱ्या गाड्या

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कोल्हापूर एक्सप्रेस
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – केएसआर बेंगळुरू एक्सप्रेस

खडकीतून सोडण्यात येणाऱ्या गाड्या

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – सोलापूर एक्सप्रेस
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – होस्पेट एक्सप्रेस