scorecardresearch

खंडाळा घाटात दरड कोसळली, पुणे-मुंबई रेल्वेसेवा पूर्णपणे विस्कळीत

पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या रेल्वे गाड्या खंडाळा, लोणावळा व विविध रेल्वे स्थानकांवर थांबविण्यात आल्या आहेत.

खंडाळा घाटात दरड कोसळली, पुणे-मुंबई रेल्वेसेवा पूर्णपणे विस्कळीत
( पुणे मुंबई लोहमार्गावर खंडाळा घाटातील नागनाथ ते पळसदरी दरम्यान पहाटेच्या सुमारास दरड कोसळली )

पुणे मुंबई लोहमार्गावर खंडाळा घाटातील नागनाथ ते पळसदरी दरम्यान पहाटेच्या सुमारास दरड कोसळल्याने पुणे मुंबई रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या रेल्वे गाड्या खंडाळा, लोणावळा व विविध रेल्वे स्थानकांवर थांबविण्यात आल्या आहेत. तर मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणार्‍या रेल्वे गाड्या कर्जत रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आल्या आहेत.

दरड कोसळल्याची माहिती समजल्यानंतर रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी व सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून युद्ध पातळीवत दरड बाजुला काढण्याचे काम सुरू आहे. लवकरच रेल्वे वाहतूक सुरळीत होईल अशी आशा आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.