पुणे : मोटारीच्या धडकेत पदपथावरील गवत काढणाऱ्या सफाई कामगार महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मुंढवा-खराडी रस्त्यावर घडली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी मोटार चालकाला अटक केली.

राजेंद्र ज्ञानोबा धुमाळ (वय ५२, रा. रायकर मळा, धायरी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे छाया मंगेश पेढारकर (वय ३९, रा. खराडी) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत ज्योती लोखंडे (वय ३७, रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. सोमवारी (२१ ऑक्टोबर) सकाळी अकराच्या सुमारास मुंढवा पुलाकडून खराडी गावाकडे येणाऱ्या रस्त्यावर ही घटना घडली.

Firing at the house of an independent candidate in Jalgaon news
जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Thieves stole gold ornaments and ₹55,000 cash from an elderly woman at Navsha Maruti temple
शहरात ज्येष्ठ नागरिकांच्या फसवणुकीचे सत्र कायम, सिंहगड रस्ता, कोंढवा भागातील घटना
farmer suicide sharad pawar
राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विषय गंभीर – शरद पवार
campaign will stop today
प्रचारतोफा आज थंडावणार, निवडणूक आयोगाची ‘छुप्या प्रचारा’वर नजर
supriya sule criticizes mahayuti
पूल, इमारती म्हणजे विकास नव्हे! सुप्रिया सुळे यांनी पक्षातील फुटिरांना फटकारले
cm eknath shinde
…विकास हाच आमचा अजेंडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट प्रतिपादन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, पेंढारकर या महापालिकेत कंत्राटी पदावर सफाई कर्मचारी म्हणून काम करतात. सोमवारी सकाळी त्या त्यांच्या सहकारी छाया यांच्यासह खराडीतील रस्त्यावर गवत काढण्याचे काम करत होत्या. त्या वेळी भरधाव मोटारीने छाया यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या छाया यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घेतली. पोलिसांनी मोटार चालक धुमाळ याला अटक केली असून, सहायक पोलीस निरीक्षक मुबारक शेख तपास करत आहेत.