Premium

पुणे महापालिकेचा अजब कारभार; ठेकेदाराबरोबर करार न करताच ८२ ठिकाणी चार्जिंग स्थानके

पर्यावरणपूरक ई-वाहनांसाठी महापालिकेने ई-चार्जिंग स्थानके उभारण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी ८२ ठिकाणी चार्जिंग स्थानके उभाण्याचा प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

Charging stations at 82 locations without contracting
शहरात ८२ ठिकाणी चार्जिंग स्थानके उभारण्यात येणार आहेत. (फोटो- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : पर्यावरणपूरक ई-वाहनांसाठी महापालिकेने ई-चार्जिंग स्थानके उभारण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी ८२ ठिकाणी चार्जिंग स्थानके उभाण्याचा प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मात्र, त्यासंदर्भातील करार महापालिकेने ठेकेदाराबरोबर केला नसल्याचे पुढे आले आहे. त्यानंतरही हव्या त्या मोक्याच्या जागा महापालिकेकडून ठेकेदाराला देण्याचा घाट घालण्यात आला आहे.

शहरातील ई-वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे ई-चार्जिंग स्थानके उभारण्याचे धोरण महापालिकेने स्वीकारले आहे. त्यानुसार शहरात ८२ ठिकाणी चार्जिंग स्थानके उभारण्यात येणार आहेत. त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर महापालिकेने संबंधित ठेकेदाराला कार्य आदेशही दिला आहे. मात्र प्रस्तावानुसार करार केला नसल्याचे पुढे आले आहे. त्यानंतरही मोक्याच्या जागा ठेकेदाराला देण्याचा घाट महापालिका घालत आहे.

आणखी वाचा-पुणेरी मेट्रोचे काम २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे आव्हान

उद्यान, क्षेत्रीय कार्यालय, नाट्यगृह, रुग्णालय, वाहनतळ येथे चार्जिंग स्थानके उभारण्यासाठी महापालिकेने निविदा काढली होती. या निविदेमध्ये संबंधित कंपनीला मोक्याच्या जागा आठ वर्षांसाठी विनामूल्य वापरता येतील. ठेकेदाराला मिळणाऱ्या नफ्यापैकी ५० टक्के हिस्सा महापालिकेला मिळेल. चार्जिंगसाठी यंत्रसामग्री, मोबाईल ॲप्लिकेशन, वीज मीटर घेणे, विद्युत देयकाची रक्कम भरणे चार्जिंग स्थानके सुरू ठेवणे, अशा अटी आहेत. तसेच ठेकेदाराकडून महापालिकेकडे २५ लाख रुपये बँक हमी घेणे यासह इतर अटी आहेत. मात्र, बँक हमी न घेताच ठेकेदारासाठी जागा शोधल्या जात आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune municipal corporation charging stations at 82 locations without contracting with contractors pune print news apk 13 mrj

First published on: 21-09-2023 at 14:18 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा