पुणे : दिवंगत माजी नगरसेवकाच्या फलकासाठी घेतलेल्या बेकायदा वीजजोडणीमुळेच नाना पेठेत शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याचा खुलासा महापालिकेच्या विद्युत विभागाकडून करण्यात आला आहे, तर विजेचा खांब पथदिव्याचा असून, पथदिव्याचा वीजपुरवठा तसेच देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी ही पुणे महानगरपालिकेकडे आहे. त्यामुळे या घटनेशी महावितरणचा कोणताही संबंध नाही, असे स्पष्टीकरण महावितरणकडून देण्यात आले आहे. या बाबतचे अधिकृत अहवाल आल्यानंतर पोलिसांकडून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

खांबात उतरलेल्या विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने सायली डंबे या आठ वर्षांच्या शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याची घटना नाना पेठेत रविवारी घडली. या दुर्घटनेत आणखी एक मुलगा जखमी झाला असून, त्याची प्रकृती स्थिर आहे. सायली डंबे आणि मुले रविवारी दुपारी नाना पेठेतील डोके तालीम परिसरात खेळत होते. त्या वेळी इनामदार चौकातील एका खांबाला सायलीचा स्पर्श झाला. या खांबात विद्युत प्रवाह उतरला होता. सायली आणि तिच्याबरोबर असलेला एक मुलाला विजेचा धक्का बसला. हा प्रकार तेथून निघालेल्या एका बसचालकाने पाहिला. त्याने तत्परता दाखवून दोघांना लाकडी बांबूने ढकलले होते. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या विद्युत विभागाने या प्रकारात कोणतेही तथ्य नसल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्युत खांबाला स्पर्श होऊन लहान मुलीचा मृत्यू झाल्याच्या प्रकारात कोणतेही तथ्य नाही. विद्युत खांबामुळे विजेचा धक्का लागलेला नसून, दिवंगत माजी नगरसेवकाच्या नावाचा फलक तेथे आहे. या फलकाला अनधिकृतपणे विद्युत जोड घेण्यात आला होता. त्यातील विजेचा धक्का लागून ही घटना घडली आहे. या ठिकाणापासून महापालिकेचा खांब पाच ते सात फूट अंतरावर आहे, असे महापालिकेच्या विद्युत विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी प्रसिद्धपत्रकाद्वारे सांगितले.