पुणे : शहरातील रस्त्यावर असलेल्या सांडपाणी वाहिन्यांची (ड्रेनेज चेंबर) झाकणे रस्त्याच्या उंचीलगत आणण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. रस्ते तयार करताना अनेक भागातील सांडपाणी वाहिन्यांची झाकणे रस्त्यापेक्षा उंच तर काही ठिकाणी खाली गेलेली आहेत. झाकणे खालीवर असल्याने अपघात होतात, तसेच वाहनचालकांना पाठदुखी, कंबरदुखीचा त्रास देखील सहन करावा लागतो, हे टाळण्यासाठी महापालिकेच्या पथ विभागाकडून शहरातील सांडपाणी वाहिन्यांची झाकणे समपातळीत आणण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

शहरात सांडपाणी वाहिन्यांची कामे करण्याबरोबरच, विद्युत वाहिन्यांसाठी तसेच पावसाळी गटारांच्या कामासाठी वाहिन्या खोदण्यात आल्या आहेत. मात्र, एकाही रस्त्यावर ही सांडपाणी वाहिन्यांची झाकणे रस्त्याच्या समपातळीत नाहीत. अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, काही ठिकाणी उंचवटाही झालेला आहे. यामुळे वारंवार अपघात होतात. याबाबत महापालिकेकडे तक्रारीदेखील दाखल करण्यात आलेल्या आहेत. महापालिका प्रशासन दरवर्षी पावसाळ्यापूर्वी सांडपाणी वाहिन्यांची झाकणे उचलून घेते. मात्र, त्याचा फारसा उपयोग होत नसल्याचे समोर आले आहे.

Mumbai , constructions, MHADA , projects, Notices ,
मुंबई : उल्लंघन करणाऱ्या ४७७ बांधकामांना नोटीस, ३३ प्रकल्पांना काम थांबविण्याचे म्हाडाचे आदेश
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Pune Municipal Corporation cleanliness drive on pedestrian bridges Pune news
अडलेले ‘पाऊल’ पडले पुढे! पादचारी पूल आवश्यक ठिकाणीच; असलेल्या पुलांवर महापालिकेची स्वच्छता मोहीम
Pimpri Municipal Corporation, transfers officers,
पिंपरी : महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या प्रलंबित; बदली धाेरणाच्या अंमलबजावणीस टाळाटाळ?
Municipal Corporation takes action against 71 unauthorized stalls in Kolhapur news
कोल्हापुरात अतिक्रमण विरोधी मोहीम
Garbage collection, pune , Garbage collection night ,
पुणे शहरात आता रात्रीही होणार कचरासंकलन, हे आहे कारण ?
Ghodbunder residents questions to thane municipal officials regarding water tanker and water issues
आम्हाला देण्यासाठी पाणी नाही मग, टँकरचालकांना कसे मिळते; घोडबंदरवासियांनी विचारला पालिका अधिकाऱ्यांना सवाल
Traffic police and Municipal Corporation are trying to speed up traffic in Pune news
वाहतूक मंदीत मिनिटभराने सुधारणा! उपाययोजनांमुळे गती वाढल्याचा पुणे पोलिसांचा दावा

हेही वाचा – ‘साने गुरुजींची जीवनगाथा’ आता ‘श्रवणीय’

u

शहरातील रस्त्यांवर सांडपाणी वाहिन्यांच्या झाकणांची पाहणी करून माहिती गोळा करण्यासाठी महापालिका प्रशासनाने सल्लागार नेमला होता. या सल्लागाराने सांडपाणी वाहिन्यांच्या झाकणांची व त्यामुळे झालेल्या खड्ड्यांची माहिती संकलित केली आहे. ही माहिती फोटो व अक्षांश-रेखांशासह पालिकेकडे उपलब्ध आहे. पालिकेच्या हद्दीसह समाविष्ट गावांमध्ये अशी १५०० हून अधिक सांडपाणी वाहिन्यांची झाकणे आहेत. या माहितीच्या आधारे प्रशासनाने कामाला सुरुवात केली आहे, अशी माहिती पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली. १५ जानेवारीपर्यंत हे सर्व कामे पूर्ण केली जाणार आहे.

हेही वाचा – शहरबात… बनावट मालाच्या बाजारपेठांना रोखणार कोण?

या कामाचा पहिला भाग म्हणून शहरातील प्रमुख रस्त्यांवरील सांडपाणी वाहिन्यांची झाकणे उचलून ती रस्त्याच्या समपातळीत आणली जाणार आहेत. यासाठी पथ विभागाकडे कोणतीही स्वतंत्र तरतूद नाही. विभागाकडे उपलब्ध असलेल्या तरतुदीमधून हा खर्च केला जाणार आहे, असेही पावसकर यांनी सांगितले.

Story img Loader