scorecardresearch

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर पुणे महापालिकेची दंडात्मक कारवाई; १० दिवसांत वसूल केला तब्बल…

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर आता पुणे महापालिकेने दंडात्मक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर पुणे महापालिकेची दंडात्मक कारवाई; १० दिवसांत वसूल केला तब्बल…
फोटो – द इंडियन एक्सप्रेस

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर आता पुणे महापालिकेने कडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. गेल्या १० दिवसांत अशा ३५३ जणांवर कारवाई करत साडेतीन लाख रुपयांचा दंड महापालिकेने वसूल केला आहे. या कारवाईसाठी पालिका प्रशासनाने विशेष पथक तयार केले असून ही मोहीम यापुढेही सुरू राहील, अशी माहितीही पुणे महापालिकेकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा – पुणे : लोकप्रतिनिधींचे हुबेहूब आवाज काढून फसवणूक करणारा तोतया पोलीस गजाआड

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, जी-२० शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने गेल्या आठवड्यापासून स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत रस्यावर कचरा टाकू नये, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, अशा विविध सुचना नागरिकांना देण्यात आल्या होत्या. मात्र, अनेक जण या सुचनांचे पालन करताना दिसून येत नाहीत. अशा लोकांवर आता पुणे महापालिकेने दंडात्मक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. गेल्या १० दिवसांत सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्याकडून महापालिकेने साडेतीन लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर पहिल्या तीन दिवसांतच १२३ लोकांवर कारवाई करत १.२३ लाख रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती पुणे महापालिकेकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा – पुणे : कौटुंबिक वादातून पत्नीवर चाकूने वार, पती अटकेत

याबरोबरच २०१६ मध्ये पुणे महापालिकेने मंजूर केलेल्या घनकचरा व्यवस्थापन मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करणाऱ्यांवरही कारावाई केली जात असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच १ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यान सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्याप्रकरणी तब्बल १२ हजार २९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्याकडून ४४ लाख ७८ हजार ४५ रुपयांचा दंडही वसूल केला असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा – पुणे : कोथरूडमध्ये हप्ता न दिल्याने दुकानदारावर चाकूने हल्ला, तिघांविरोधात गुन्हा दाखल

सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. याबाबत महापालिकेने जनजागृतीलदेखील केली आहे. मात्र, काही लोकं महापालिकेच्या नियमांचे पालन करताना दिसून येत नाहीत, अशा लोकांवर आता आम्ही कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. ही मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे, अशी प्रतिक्रिया पुणे महापालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख आशा राऊत यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-01-2023 at 08:44 IST

संबंधित बातम्या