पुणे : चालू आर्थिक वर्षातील मिळकतकराच्या देयकापोटी धनादेश दिलेल्या, मात्र तो न वटलेल्या मिळकतधारकांवर शनिवारपासून कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाने घेतला आहे. कलम १३८ अन्वये ही कारवाई करण्यात येणार आहे.

मिळकतकर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख आर्थिक स्रोत आहे. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील मिळकतकर काही मिळकतधारकांनी धनादेशाद्वारे भरला होता. एक एप्रिल ते ३१ जुलै या कालावधीत न वटलेल्या धनादेशांची संख्या एकूण १ हजार ९६८ एवढी असून ८ कोटी ३३ लाख, ९३ हजार ८४३ एवढ्या रकमेची मागणी आहे. त्यापैकी कर आकारणी आणि कर संकलन विभागाने त्यापैकी १ हजार २९२ धनादेशाची एकूण ४ कोटी ५७ लाख ३५ हजार ३१७ एवढी रक्कम वसूल केली आहे.

mahametro pimpri
पिंपरी: मेट्रोचा महापालिकेच्या जागांवर डोळा, आता…
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
passengers had to be pulled out of water along with their bags and belongings at pune railway station
पुणे रेल्वे स्थानक ‘पाण्यात’! बॅग, सामानासह पाण्यातून वाट काढण्याची प्रवाशांवर वेळ
Aman Sehrawat Wins Bronze Medal In Wrestling
Paris Olympics 2024: २१ वर्षीय अमन सेहरावतने पॅरिसमध्ये जिंकलं कुस्तीतील पहिलं पदक, भारतीय कुस्तीची परंपरा ठेवली कायम
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी मनसे कार्यकर्त्यांचा राडा, कारची काच फोडली, शेण व बांगड्या फेकत म्हणाले…
vinesh phogat loksatta editorial today
अग्रलेख: ‘विनेश’काले…
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड
police complaint against pooja khedkar father Dilip Khedkar
पूजा खेडकरांच्य वडिलांविरुद्ध पोलिसांकडे तक्रार अर्ज- दिलीप खेडकरांच्या अडचणीत वाढ

हेही वाचा…पिंपरी: मेट्रोचा महापालिकेच्या जागांवर डोळा, आता…

उर्वरीत १४७ मिळकतधारकांना कलम १३८ अन्वये नोटीस बजाविण्यात आली आहे. त्यांच्यावर न्यायालयात दावा दाखल करण्याची प्रक्रियाही प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती कर आकारणी आणि कर संकलन विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिली.