पुणे महानगरपालिका अंदाजपत्रक २०१८: जीएसटी, मिळकतकरातून उत्पन्न वाढीवर भर

गतवर्षी उत्पन्न कमी आणि खर्च वाढले..

eleven villages, Pune, Municipal Corporation, marathi news
(संग्रहित छायाचित्र)

पुणे महापालिकेला दि. १ एप्रिल ते डिसेंबर २०१७ अखेर जीएसटीमधून १ हजार २८३ कोटींचे उत्पन्न मिळाले असून मार्च २०१८ अखेर १ हजार ७५५ कोटी एकूण उत्पन्न मिळेल असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. तर चालू आर्थिक वर्षात वाढ करून २०१८-१९ साठी जीएसटीमधून १ हजार ८८२ रुपयांचे उत्पन्न मिळेल असे उद्दिष्ट ठेवले आहे.

जीआयएस मॅपिंग द्वारे ८ लाख ५० हजार मिळकतींचे सर्वेक्षण करण्यात आले असून मिळकत करातून १ हजार ८१० कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तर बांधकाम विभागामार्फत डिसेंबर २०१७ अखेर ३३९ कोटींचे उत्पन्न मिळाले. मार्च २०१८ अखेर ४५० कोटी उत्पन्न अपेक्षित असून चालू आर्थिक वर्षांसाठी ७५० कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

यावेळी महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, आयुक्त कुणाल कुमार, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेना गटनेते संजय भोसले, एमआयएमच्या गटनेत्या अश्विनी लांडगे तसेच नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pune municipality budget 2018 expect more income from gst and property tax