पुणे महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

रोहिदास आरेकर (वय ६१) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.

Women died in Chembur , mishap, accident, Women died in Chembur by collapsing tree on her body , Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
Mumbai : यापूर्वी चेंबूरमध्ये जुलै महिन्यात कांचन नाथ या मॉर्निंग वॉकला गेल्या असताना त्यांच्या अंगावर नारळाचे झाड पडले होते. त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यावेळी पालिकेने जोरदार वाऱ्यांमुळे झाड पडल्याचे सांगत आपली जबाबदारी झटकली होती.

पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द येथील विहिरीत महापालिकेच्या एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आज (सोमवार) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेचा अधिक तपास सिंहगड पोलिस करत आहेत. रोहिदास आरेकर (वय ६१) असे मृत सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहिदास आरेकर यांना सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द येथील विहिरीमध्ये उडी मारताना काही नागरिकांनी पाहिले. त्यांनी लगेच अग्निशामक दल व पोलिसांना याची माहिती दिली. आरेकर यांना विहिरीतून काढण्यापूर्वीच त्यांचा बुडून मृत्यू झाला. काही वेळाने अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी विहिरीतून आरेकर यांचा मृतदेह बाहेर काढला. आरेकरांच्या आत्महत्या कारण समजू शकलेले नाही. सिंहगड पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pune municipality retired employee suicide sinhagad road well