पुणे : दुहेरी हत्याकांडाचे गूढ कायम ; सीसीटीव्ही फुटेजमुळे घटनेला वेगळं वळण लागण्याची शक्यता!

‘ते’ चारचाकी वाहन सहकारनगर परिसरात लावून स्वारगेटकडे चालत गेलेला तो व्यक्ती कोण? पोलिसांचा तपास सुरू

Pune Mystery of double murder remains
आबिद शेखच्या शोधासाठी पोलिसांनी सात पथकं रवाना केली आहेत.

पुण्यातील धानोरी परिसरात राहणाऱ्या महिलेसह तिच्या सहा वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली. सासवड आणि कात्रजच्या नवीन बोगद्याजवळ काल ही घटना घडली. दरम्याना, या घटनेचे महत्वाचे धागेदोरे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. यामुळे आता या घटनेला वेगळं वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आलिया शेख (वय ३५) आणि आयान शेख (वय ६) असे हत्या झालेल्या मायलेकाचे नाव आहे.

झोन दोनचे उपायुक्त सागर पाटील यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, धानोरी परिसरात आबिद शेख, पत्नी आलिया व त्यांचा मुलगा आयान असे तिघे जण राहत होते. पती आणि पत्नी हे उच्च शिक्षित होते. पती आबिद हा एका फायनान्स कंपनीत कामाला होता. तर पत्नी आलिया यांनी मुलगा आयानच्या आजारामुळे अडीच वर्षांपूर्वीच नोकरी सोडली होती. त्याच्यावर उपचार देखील सुरू असताना, आयानला शिकणवण्यासाठी घरीच एक शिक्षिका देखील येत होती. दरम्यान सोमवारी तिघेजण फिरण्यास बाहेर जाणार असल्याने, आबिद चारचाकी गाडी घेऊन आला व त्यानुसार तिघेजण फिरण्यास गेले. मात्र तेथून पुढे, या तिघांचा कोणाला संपर्क झाला नाही. पत्नी आलियाचा मृतदेह सासवड येथे आढळून आला. तर सहा वर्षाच्या आयानचा मृतदेह कात्रजच्या नवीन बोगद्या जवळ आढळून आला.

दुहेरी हत्याकांडाने पुणे हादरलं! आई आणि पाच वर्षाच्या मुलाच्या हत्येने खळबळ; पती बेपत्ता असल्याने गूढ वाढलं

तसेच, या घटनेची आम्हाला माहिती मिळताच, तिथे जाऊन पाहणी केली. या दोन्ही घटना लक्षात घेऊन, आम्ही सीसीटीव्ही मधून शोध घेतला असता. ज्या चारचाकी वाहनाने ते तिघे जण फिरण्यास गेले होते. ते वाहन सहकारनगर भागात एक व्यक्ती लावून पुढे स्वारगेटच्या दिशेने चालत जात असताना दिसून आले. मात्र ती व्यक्ती नेमकी कोण होती? हे स्पष्टपणे सीसीटीव्हीमध्ये नेमके दिसू शकले नाही. मात्र ज्यावेळी अबिद शेख सापडेल, तेव्हाच या खुना मागचे कारण समजू शकणार आहे. आबिद शेखच्या शोधासाठी, आम्ही सात पथके रवाना केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pune mystery of double murder remains cctv footage is likely to take a different turn msr 87 svk

ताज्या बातम्या