पुणे : उन्हाळ्याच्या प्रवास हंगामातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पुणे आणि नागपूरला जोडणारी ‘वीकेंड समर स्पेशल’ गाडी धावणार आहे. तसेच हडपसर ते बनारस एकमार्गी उन्हाळी विशेष गाडी पुण्यातून सोडण्यात येणार आहे. मध्य रेल्वेकडून निवेदनाद्वारे ही माहिती देण्यात आली.

हडपसर (पुणे) ते बनारस एकमार्गी विशेष गाडी

हडपसर ते बनारस विशेष गाडी गुरुवारी (३० एप्रिल) सकाळी सात वाजून ५० मिनिटांनी हडपसर रेल्वे स्थानकावरून सुटणार असून, दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ( १ मे ) दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी ही गाडी बनारसला पोहचणार आहे.

या गाडीला दौंड दोरमार्ग, अहिल्यानगर, कोपरगाव, अंकाई, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज, आणि ज्ञानपूर रोड हे थांबे आहेत. या गाडीला २२ डबे असणार आहेत. अमृत भारत उद्घाटन स्पेशल रेकसह ही गाडी धावणार असून, धावेल यात ८ स्लीपर क्लास, ११ जनरल सेकंड क्लास, १ पँट्री कार, आणि 2 गार्ड/लगेज व्हॅन डबे अशी या गाडीची रचना आहे.

पुणे–नागपूर–पुणे वीकेंड समर स्पेशल (२ फेऱ्या)

पुणे–नागपूर विशेष गाडी शुक्रवारी ( ०१ मे) पुण्यातून दुपारी तीन वाजून ५० मिनिटांनी सुटणार असून, दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी नागपूरला पोहचणार आहे. तर, नागपूरहून पुण्यासाठी रविवारी (३ मे) सकाळी सात वाजता गाडी सुटणार असून, त्याच दिवशी रात्री साडेअकर वाजता पुण्याला पोहचणार आहे.

या गाडीला उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, अंकाई, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा हे थांबे आहेत. तसेच १ एसी २-टियर, १ एसी ३-टियर, १२ स्लीपर क्लास, ०४ जनरल सेकंड क्लास आणि ०२ गार्ड/लगेज व्हॅन असे एकूण २० डबे, अशी या गाडीची रचना आहे.

आरक्षण आणि तिकीट

या विशेष गाड्यांसाठी विशेष शुल्कावरील बुकिंग २९ एप्रिलपासून संगणकीकृत पीआरएस तिकीट काउंटरवर आणि आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर (www.irctc.co.in) सुरू झाले आहे. तर, या गाड्यांमधील जनरल सेकंड क्लास आणि गार्ड/लगेज व्हॅन हे अनारक्षित डबे आहेत.
या डब्यांची तिकिटे UTS प्रणालीद्वारे (UTS ॲप आणि बुकिंग काउंटर) सुपरफास्ट/मेल/एक्स्प्रेस गाड्यांसाठी लागू असलेल्या सामान्य शुल्कासह काढता येणार आहेत. प्रवास सुरू करण्यापूर्वी, इंडियन रेल्वेच्या http://www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन किंवा अधिकृत NTES ॲप डाउनलोड करून, मार्गावरील थांबे स्थानकांवरील आगमनाच्या आणि प्रस्थानाच्या सविस्तर वेळा तपासाव्यात, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.