पुणे : भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात बालिकेवर अत्याचार करुन तिचा खून करण्यात आल्याची घटना घडली. त्यानंतर मुंबई-बंगळुुरू बाह्यवळण मार्गावरील वडगाव पुलावर दीड तास चक्का जाम आंदोलन करण्यात आली. आंदोलनामुळे बाह्यवळण मार्गावर वाहतूक विस्कळीत होऊन कोंडी झाली.

बालिकेवर अत्याचार करुन खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर नसरापूर परिसरात संतप्त पडसाद उमटले. नसरापूर परिसरात संतप्त पडसाद उमटले. पीडित बालिकेचा मृतदेह धायरी परिसरात आणण्यात आला. त्यानंतर नागरिकांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली, तसेच आरोपीला ताब्यात देण्याची मागणी केली. आरोपीविरुद्ध कठोर कारवाईचे आश्वास मिळत नाही, तोपर्यत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतली. त्यानंतर नातेवाईक आणि नागरिकांनी वडगाव उड्डाणपुलावर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर दाेन्ही बाजुची वाहतूक ठप्प झाली. पोलिसांनी आंदोलक आणि नोतवाईकांची समजूत घालून त्यांची संवाद साधला. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी घटनास्थळी भेट दिली. नागरिकांशी त्यांनी संवाद साधला.

पोलिसांनी सौम्य बळाचा वापरा करून रात्री दहाच्या सुमारास आंदोलकाना वडगाव पूल परिसरातून बाजुला काढले. पोलिसांनी आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर रात्री सव्वा दहाच्या सुमारास बाह्यवळण मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.