scorecardresearch

पुणे शहराचं विभाजन करण्याची आवश्यकता; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं ‘हे’ कारण

दोन महापालिकांबाबत पाटील यांनी स्पष्ट भूमिका घेतल्याने निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.

पुणे शहराचं विभाजन करण्याची आवश्यकता; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं ‘हे’ कारण
चंद्रकांत पाटील

पुणे : शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्येचा विचार करता पुण्याचे विभाजन करून दोन महापालिकांची आवश्यकता आहे, अशी भूमिका राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री, कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी येथे मांडली.

हेही वाचा – हेही वाचा – महिलेला मारहाण करणं राज ठाकरेंना तरी पटेल का? आरोपी मनसे पदाधिकारी म्हणाला…

पुण्यात एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील बोलत होते. दोन महापालिकांबाबत पाटील यांनी स्पष्ट भूमिका घेतल्याने निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.

गेल्या पाच वर्षात शहराच्या हद्दीत एकूण ३४ गावांचा टप्याटप्याने समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शहराची भौगोलिक हद्दवाढ झाली असून पुणे देशातील सर्वाधिक मोठी महापालिका ठरली आहे. शहराचा वाढता विस्तार आणि वाढती लोकसंख्येमुळे पायाभूत सुविधा पुरविण्यावर महापालिकेला मर्यादा येत आहेत. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी दोन महापालिकांची आवश्यकता अधोरेखीत केली.

हेही वाचा – हेही वाचा – राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “बाळासाहेबांच्या…!”

वाढत्या विस्ताराने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. दोन महापालिका करण्याची माझी भूमिका राजकीय नाही. मात्र कामकाजाच्या दृष्टीने सुलभता यावी, यासाठी हा निर्णय आवश्यक आहे. दोन महापालिका झाल्यास समस्या तातडीने सुटतील, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या