Pune Breaking News Updates : राज्यातील दुसऱ्या क्रमाकांचे मोठे शहर असलेल्या पुण्यातील विविध घडामोडी तसंच पुणे परिसरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती या लाईव्ह न्यूज ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत. वाहतूकीचे अपडेट्स, गुन्हे वृत्त, नागरी समस्या, राजकीय घडामोडी तसंच महत्त्वाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची माहितीही इथे मिळेल…
Pune Maharashtra News Today 13 march 2025
तुमच्या लहान मुलांना लस दिलीत का? सरकारकडून मोफत लसीकरण मोहीम सुरु
पुणे : राज्यात जपानी मेंदूज्वर (जपानी एन्सेफलायटिस) लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात रायगड, परभणी, पुणे या तीन जिल्ह्यांत आणि पनवेल, परभणी, पिंपरी-चिंचवड, पुणे या चार महापालिकांमध्ये ही लसीकरण मोहीम १ मार्चपासून सुरू झाली आहे. पुणे महापालिकेने या मोहिमेत आतापर्यंत १ लाखांहून अधिक मुलांना लस दिली आहे.
बारामती : एका रात्रीच सातबारा उताऱ्यावरची नावे गायब, म्हाडा प्लॉटधारकांचे बारामतीत उपोषण
बारामती : बारामतीत म्हाडाच्या प्लॉटधारकांच्या जागेवर आयुर्वेदिक महाविद्यालय उभारून म्हाडाच्या प्लॉटधारकांना पाच किलोमीटरच्या हद्दीत पर्यायी जागा न दिल्याने म्हाडा प्लॉटधारकांनी काल बुधवारपासून उपोषणाला सुरुवात केली.
“पिंपरी- चिंचवड : होळी आणि धुळवडीच्या दिवशी हुल्लडबाजी केल्यास…”; पोलीस उपायुक्तांचा इशारा
होळी आणि धुळवडीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी- चिंचवडमध्ये दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. होळी आणि धुळवडीच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पिंपरी चिंचवड पोलिसांनी कंबर कसली आहे. सविस्तर वाचा…
धुळवडीनिमित्त उद्या सकाळी सहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत पुणे मेट्रोची सेवा बंद राहणार
वनाझ ते रामवाडी आणि निगडी ते स्वारगेट या 33 किलो मीटरच्या पुणे मेट्रोला पुणेकर नागरिकांचा दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळत आहे.मेट्रोमध्ये अधिकाधिक नागरिकांनी प्रवास करावा,यासाठी पुणे मेट्रोकडून विविध उपक्रम हाती घेतले जात आहे.यामुळे दिवसेंदिवस लक्षणीय प्रवासी संख्या वाढताना दिसत असून दररोज सरासरी दीड लाखाच्या घरात मेट्रोने नागरिक प्रवास करित आहे.
पण दररोज मेट्रोने प्रवास करणार्या नागरिकांसाठी महत्वाची माहीती समोर येत आहे. धुळवडीनिमित्त उद्या सकाळी सहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत पुणे मेट्रोची सेवा बंद राहणार आणि त्यानंतर तीन ते रात्री अकरा वाजेपर्यंत मेट्रो सुरू राहणार आहे.याबाबत पुणे मेट्रोकडून कळविण्यात आली आहे.याबाबत नागरिकांनी नोंद घेण्यात यावी,असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
वाहतूक कोंडीमुक्तीसाठी महामार्गांवरील दोन हजार, अतिक्रमणे जमीनदोस्त
पुणे : शहर आणि परिसरातील राष्ट्रीय आणि राज्य मार्गांवरील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) धडक मोहीम राबविण्यात येत असून गेल्या नऊ दिवसांत सुमारे दोन हजार अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली आहेत.
धुळवडीनिमित्त उद्या सकाळी सहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत पुणे मेट्रोची सेवा बंद राहणार आणि त्यानंतर तीन ते रात्री अकरा वाजेपर्यंत मेट्रो सुरू राहणार आहे. याबाबत पुणे मेट्रोकडून कळविण्यात आले आहे.
पुणेकरांच्या हाती भोपळा काँग्रेस नेत्याची बोचरी टीका !
पुणे : ‘लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला साथ देणाऱ्या पुणेकरांच्या हाती अंदाजपत्रकात मात्र ‘भोपळाच’ देण्याचे काम महायुती सरकारने केले. निवडणुकीपूर्वी सत्ताधारी असलेल्या महायुती सरकारने पुणेकरांना अनेक स्वप्न दाखवली होती मात्र सत्तेत आल्यानंतर याचा विसर राज्यकर्त्यांना पडला आहे, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी केली.
धुळवडीनिमित्त उद्या सकाळी सहा दुपारी तीन वाजेपर्यंत पुणे मेट्रोची सेवा बंद
धुळवडीनिमित्त उद्या सकाळी सहा दुपारी तीन वाजेपर्यंत पुणे मेट्रोची सेवा बंद राहणार आणि त्यानंतर तीन ते रात्री अकरा वाजेपर्यंत मेट्रो सुरू राहणार आहे. याबाबत पुणे मेट्रोकडून कळविण्यात आले आहे.
नाट्यगृहे, सांस्कृतिक केंद्रांची माहिती मिळणार घरबसल्या !
पुणे : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुणे शहरात अनेक सांस्कृतिक उपक्रम होत असतात. सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी पुणे महापालिकेच्या वतीने शहरातील विविध भागात नाट्यगृह, सांस्कृतिक केंद्र, सुरू करण्यात आली आहेत.
सावधान… महापालिका करणार एक लाखाचा दंड!
पुणे : होळीसाठी शहरात वृक्षतोडीचे प्रकार होतात. याला आळा घालण्यासाठी महापालिकेने कठोर पावले उचलली आहेत. होळीसाठी वृक्षतोड करताना आढळल्यास संबंधित नागरिकांना एक लाख रुपयांचा दंड केला जाणार आहे.
केवळ एक महिन्याच्या बाळावर रोबोटिक शस्त्रक्रिया! जगात प्रथमच अशी प्रक्रिया झाल्याचा डॉक्टरांचा दावा
पुणे : मूत्रपिंडाचा गंभीर विकार असलेल्या एक महिन्याच्या बाळाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पारंपरिक शस्त्रक्रियेत जोखीम असल्याने डॉक्टरांनी रोबोटिक शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. या बाळावर अत्याधुनिक पद्धतीने उपचार करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. एवढ्या लहान बाळावर अशा प्रकारे पहिल्यांदाच रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आल्याचा दावा रुग्णालयाने केला आहे.
किमान श्वास घेण्यासाठी तरी स्वच्छ हवा द्या…
उद्योगांसह वाहनांमुळे होणारे प्रदूषण त्यातच बांधकाम प्रकल्पाची भर यामुळे श्वास घेण्यासाठी स्वच्छ हवा मिळेना. अखेर हजारो नागरिकांना रस्त्यावर उतरून स्वच्छ हवेची मागणी करावी लागली. राज्याच्या नुकत्याच जाहीर झालेल्या आर्थिक पाहणी अहवालातही पुण्यातील या गंभीर समस्येवर बोट ठेवण्यात आले आहे.
पिंपरी कॅम्पमधील बाजारपेठ लवकरच कायमस्वरूपी वाहनमुक्त
पिंपरी : शहरातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या पिंपरी कॅम्पमधील वाहनमुक्त उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. या उपक्रमामुळे नवीन ग्राहकांमध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. बाजारपेठेतील रस्ता कायमस्वरूपी पादचारी मार्ग करण्याची व्यापाऱ्यांची मागणी आहे. त्यानुसार पिंपरी बाजारपेठ वाहनमुक्त करणार असल्याचे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.
पुणे बातम्या
