Latest News in Pune Today : पुणे परिसरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती तसेच वाहतूकीचे अपडेट्स, गुन्हे वृत्त, नागरी समस्या, राजकीय घडामोडी आणि महत्त्वाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची माहितीही या लाईव्ह न्यूज ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत…
Pune Maharashtra News Today 18 march 2025
तापमानवाढीमुळे पर्जन्यमानात वाढ
पुणे : जागतिक तापमानवाढीमुळे येत्या काळात पावसाचे प्रमाण वाढेल, असा अंदाज भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेचे संचालक (आयआयटीएम) डॉ. आर. कृष्णन यांनी सोमवारी व्यक्त केला.
आरटीई अंतर्गत प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी… कधीपर्यंत घेता येणार प्रवेश ?
पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली जाणार आहे. या विद्यार्थ्यांचे प्रवेश १८ मार्चपासून सुरू होणार असून, प्रवेशासाठी २४ मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
मान्सूनचा अंदाज वर्तवण्यात अनेक आव्हाने
पुणे : ‘मान्सूनचा अभ्यास, मान्सूनच्या अंदाजांमध्ये भारतात मोठी प्रगती झाली आहे. आजपर्यंतच्या अभ्यासातून मान्सूनचे विविध पैलू समजले आहेत. मात्र, आता अधिक सखोल निरीक्षणे, अंदाज वर्तवण्यात अनेक आव्हाने आहेत,’ असे मत भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी सोमवारी मांडले.
मिळकतकर विभागाबाबत आयुक्तांनी घेतला मोठा निर्णय!
पुणे : मिळकतकर विभागाचे घटत असलेले उत्पन्न, सर्व्हरमध्ये होणारा तांत्रिक बिघाड, कर आकारणीबाबत नागरिकांकडून आलेल्या तक्रारी आणि वारंवार हेलपाटे मारल्यानंतरही कर्मचाऱ्यांकडून न दिला जाणारा प्रतिसाद या सर्व पार्श्वभूमीवर मिळकतकर विभागाचा आढावा घेण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी घेतला आहे.
उच्च सुरक्षा क्रमांक पाटी लावणाऱ्या कंपन्यांची नियुक्ती बेकायदा, मुख्य सचिवांकडे तक्रार
पुणे : प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) जुन्या वाहनांसाठी ‘उच्च सुरक्षा क्रमांक पाटी’ (एचएसआरपी) बसविणाऱ्या तीन कंपन्यांची केलेली नियुक्ती बेकायदेशीर आहे. तसेच यापैकी एक कंपनी वादग्रस्त असताना त्याच कंपनीला पुन्हा कंत्राट दिल्याचा आरोप करत राज्याचे मुख्य सचिवांकडे तक्रार करण्यात आली आहे.
पिंपरी : महापालिकेच्या दोन अतिरिक्त आयुक्तांसह ३४ अधिकाऱ्यांना नोटीसा; वाचा नेमके काय आहे प्रकरण?
पिंपरी : नागरिकांना भेटीसाठी राखीव ठेवलेल्या आठवड्यातील तीन दिवसांच्या वेळेत दोन अतिरिक्त आयुक्तांसह ३४ वरिष्ठ अधिकारी गैरहजर राहिल्याचे समोर आले आहे. या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत.
पुरंदर विमानतळ परिसरातील जमीन खरेदी-विक्री व्यवहार बंद!
पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनाला दोन वर्षे विलंब झाला असला, तरी या परिसरात जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात वाढ झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या उच्चाधिकार समितीने बाधित क्षेत्र आणि लगतच्या परिसरातील जमिनींच्या व्यवहारांवर निर्बंध आणण्यासाठी अंतिम अधिसूचना काढण्याचे आदेश महाराष्ट्र औद्याोगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
कल्याणीनगर अपघात प्रकरणाची सुनावणी लवकरच सुरू
पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणाची सुनावणी लवकरच सुरू होणार आहे. या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून शिशिर हिरे काम पाहत आहेत. अपघात प्रकरणात एकूण तीन गुन्हे दाखल झाले आहेत.
शहरबात : भेसळ करणाऱ्यांवर जरब बसवाच
पनीर, खव्यासह पदार्थातील भेसळ म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळ असून, खाद्यान्नातील भेसळ रोखण्यासाठी आता कठोर उपाययोजना करण्याची वेळ आली आहे. भेसळ करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई तर व्हायला हवी. मात्र, ही कारवाई एवढी कडक व्हायला हवी की, भेसळ करण्याचे धाडस होणार नाही.
चंदननगर भागातील लॉजमध्ये तरुणाचा मृतदेह
पुणे : चंदननगर भागातील एका लॉजमध्ये तरुणाचा मृतदेह सापडल्याची घटना उघडकीस आली. तरुणाच्या मृत्यूमागचे कारण समजू शकले नाही. त्याला दारू पिण्याचे व्यसन होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पिंपरी: बोपखेल येथे तरुणावर कोयत्याने वार
पिंपरी : भांडण सोडविल्याच्या रागातून दोघांनी एका तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना बोपखेल येथे घडली. विशाल शामे वाल्मीकी ( वय २६, रा. बोपखेल) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘गे’ ॲपच्या माध्यमातून ओळखीनंतर खंडणीची मागणी, विद्यार्थ्याच्या आत्महत्येचा प्रकार उघड; दोन तरुणांना अटक
पिंपरी : नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याने तीन आठवड्यांपूर्वी केलेल्या आत्महत्येचे गुढ उकलण्यात पिंपरी पोलिसांना यश आले आहे. ‘गे’ उपयोजनच्या (ॲप) माध्यमातून झालेल्या ओळखीनंतर काढलेले छायाचित्र आणि चित्रीकरण समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देऊन ५० हजारांची खंडणी मागितल्याने विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे तपासात समोर आले.
पुणे महानगरपालिका