Latest News in Pune Today : भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांचं प्रसुतीदरम्यान निधन झालं. दरम्यान या प्रकरणाच्या चौकशीसाठी आरोग्य विभागाच्या समितीचा अहवाल समोर आला आहे. या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपणाचे राजकारण सुरू असताना नवीन खुलासे समोर येत आहेत. या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून या प्रकरणाच्या तसेच पुणे शहर व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घ्या…
[caption id="attachment_5004895" align="alignnone" width="670"] पुणे न्यूज लाईव्ह अपडेट्स[/caption]
पुणे : कृषिमंत्री कोकाटेंच्या विधानाविरोधात शिवसेनेचे आंदोलन
‘कृषिमंत्री शेतकरी आणि सरकारमधील दुवा असतो. मात्र, कोकाटे त्याला कलंक आहेत,’ असेही मोरे यांनी सांगितले.
स्वारगेट बलात्कार प्रकरण : गाडेच्या पोलीस कोठडीसाठी पुन्हा अपील
स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा सखोल तपास करायचा असल्याने गाडेची पोलीस कोठडी मिळवण्यासाठी गुन्हे शाखेने यापूर्वी दोनदा न्यायालयात अर्ज केला होता.
स्वच्छ पाण्यासाठी सर्वंकष आराखडा; खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी
पुणे महापालिकेतील विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी तसेच बारामती लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या भागात महापालिकेच्या प्रलंबित विकासकामांची माहिती घेण्यासाठी खासदार सुळे यांनी बैठक घेतली.
‘स्मार्ट सिटी’ नव्या रूपात, ‘एसपीव्ही’ कंपनी सुरूच राहणार; पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांची माहिती
स्मार्ट सिटी प्रकल्पांसाठी दिला जाणारा निधी केंद्र सरकारने ३१ मार्च २०२५ पासून देण्यास बंद केला आहे.
विमानासाठीचा स्वदेशी बनावटीचा ‘सिम्युलेटर’; परदेशी बनावटीच्या सिम्युलेटरपेक्षा कमी खर्चात निर्मिती
केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या सिम्युलेटरचे उद्घाटन करण्यात आले.
ससून रुग्णालय आवारात स्वतंत्र पोलीस चौकी, पोलीस आयुक्तांचा निर्णय
रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ललितच्या साथीदाराकडून दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते.
‘फुलराणी’ची सत्तरी; तरी फेरीची मौज अजूनही भारी!
पेशवे उद्यानात मंगळवारी सकाळी ११ वाजता बाळगोपाळांच्या उपस्थितीत छोटेखानी कार्यक्रमात केक कापून फुलराणीचा वाढदिवस साजरा करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांनी दिली.