युएई येथे सुरु असलेल्या इंडीयन प्रिमीअर लिग अर्थात आयपीएलच्या क्रिकेट सामन्यावर सट्टा लावल्याप्रकरणी पुण्यात एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आयपीएल २०२१ मध्ये करोना विषाणूचा शिरकाव झाल्यानंतर सामने थांबवण्यात आले होते. त्यानंतर १९ सप्टेंबर पासून आयपीएलच्या सामन्यांना युएईमध्ये सुरुवात झाली आहे. रविवारी झालेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्सच्या सामन्यावर ऑनलाईन सट्टा लावल्याप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून रोख रक्कम आणि इतर वस्तू मिळून असा एकूण ९२ लाख ६५ हजार रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

गणेश भिवराज भुतडा (५०) रा. रस्ता पेठ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्ता पेठेतील त्रिमूर्ती सोसायटीत रविवारी रात्रीच्या सुमारास आयपीएलच्या सामन्यांवर ऑनलाईन सट्टा सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार घटनास्थळी छापा टाकला असता ऑनलाईन सट्टा लावण्याचा प्रकार समोर आला. घटनास्थळी डायरी,मोबाईल,रोख रक्कम आढळून आली. आरोपी गणेश भिवराज भुतडा याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने अबुधाबी येथे सुरू असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्सच्या सामन्यावर ऑनलाईन सट्टा सुरू असल्याची कबुली दिली. यावेळी ९२ लाख रोख रक्कम आणि ६५ हजार किमतीचे मोबाईल, नोटा मोजण्याची मशीन,बनावट कागद पत्रे, सिमकार्ड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

pune marathi news, pune bail marathi news
पुणे: बनावट कागदपत्रे तयार करून जामीनदार उभा करणे अंगलट; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
police case marathi news, prithvi shaw marathi news
‘पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश द्या’, पृथ्वी शॉविरोधात गुन्हा न नोंदवल्याचे प्रकरण
Actor Sonu Sood made an anonymous post about trolling of Hardik Pandya
IPL 2024 : एक दिवस कौतुक करायचं, दुसऱ्या दिवशी हुर्यो उडवायची अशी वागणूक देशाच्या हिरोंना देऊ नका – सोनू सूद
Husband Wife Fights Reached High Court Due To Domestic Work
आजारी पत्नीला काम करायला लावणं ही क्रूरता! न्यायालयाचं स्पष्ट मत, पण निकाल मात्र पतीच्या बाजूने, कारण..

या प्रकरणी आणखी अनेक मोठी नावे समोर येण्याची शक्यता आहे असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, त्या अनुषंगाने पोलिसांकडून तपास सुरू आहे.