scorecardresearch

पुणे : टपाल खात्याचा एक दिवसीय संप यशस्वी

पुणे शहरासह विभागात विविध मागण्यांसाठी टपाला कर्मचाऱ्यांच्या संयुक्त संघटनांच्या वतीने बुधवारी एक दिवसीय लाक्षणिक संप करण्यात आला.

पुणे : टपाल खात्याचा एक दिवसीय संप यशस्वी
( टपाल खात्याचा एक दिवसीय संप )

पुणे शहरासह विभागात विविध मागण्यांसाठी टपाला कर्मचाऱ्यांच्या संयुक्त संघटनांच्या वतीने बुधवारी एक दिवसीय लाक्षणिक संप करण्यात आला. हा संप १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावाही संघटनांकडून करण्यात आला. या संपामुळे टपालाची सर्व अत्यावश्यक सेवा ठप्प झाली होती. यामुळे संपामुळे लाखो रूपयांचा टपाल खात्याचा महसूल बुडाला. संपामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

डाक मित्र योजना व कॉमन सर्व्हिसच्या माध्यमातून टपाल खात्याचे खासगीकरणाचे धोरण थांबवा तसेच डाक बचत बँकेचे पोस्ट पेमेंट या खासगी बँकेत विलीणीकएरण करण्याचा प्रस्ताव रद्द करा, नवीन पेन्शा योजना रद्द करा आणि सर्व कर्मचा-यांना जुनी पारंपरिक पेन्शन योजना लागू करा, ट्रेड युनियनवरील हल्ले थांबवा या आणि इतर मागण्यासाठी टपाल कर्मचारी संयुक्त कृती समितीच्यावतीने बुधवारी संप पुकारण्यात आला होता.

संपामुळे पुणे शहरातील पूर्व आणि पश्चिम भागातील १२० आणि ग्रामीण भागातील ९० टपाल कार्यालये पूर्णपणे बंद होती. याबरोबरच स्पीड पोस्ट, पार्सल सेवा, राखी मेल बुकिंग आणि डिलिव्हरी, पोस्ट सेविंग बँक, मेल मोटार सर्व्हिस, रेल्वे मोटार सर्व्हिस, या सर्व वाहतूक सेवा संपामुळे बंद होत्या. या देशव्यापी लाक्षणिक संपात पुणे शहरातील सर्व टपाल कर्मचारी सहभागी झाले होते. संपात ऑल इंडिया पोस्टल एम्पॉईज युनियन, नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एप्मॉईज, ग्रपु सी, पोस्टमन व एम.टी.एस.व जी.डी.एस.नॅशनल युनियन या संघटनाचे पदाधिकारी सहभागी झाले होते, अशी माहिती कृती समितीचे राजु तुपे, गणेश खेडकर यांनी दिली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या