शासनाचे आदेश प्राप्त झाले नसल्याचा दावा
पुणे : संचारबंदी काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: शिवभोजन थाळी मोफत देण्याची घोषणा के ली असली, तरी संचारबंदीच्या पहिल्या दिवशी पुण्यात सशुल्क शिवभोजन थाळी देण्यात आली. शासनाचे आदेश गुरुवारी सायंकाळी विलंबाने प्राप्त झाल्याने दिवसभर ही थाळी सशुल्कच देण्यात आली, असे अन्नधान्य वितरण विभागाकडून सांगण्यात आले. तसेच शुक्रवारपासून मात्र, मोफत थाळी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पुणे महापालिके तील हॉटेल निशिगंधा, बुधवार पेठेतील श्री स्वामी समर्थ कृपा स्नॅक्स सेंटर, कात्रज कॉर्नर येथील जेएसपीएम उपाहारगृह, शुक्रवार पेठेतील एस. कु मार वडेवाले, मार्के टयार्डमधील श्री स्वामी समर्थ टी अॅण्ड स्नॅक्स, स्वारगेट एसटी आगार येथील के . जी. गुप्ता अॅण्ड सन्स स्नॅक्स, कौटुंबिक न्यायालय परिसरातील श्री स्वामी समर्थ स्नॅक्स अॅण्ड टी हाऊस, बिबवेवाडीतील हॉटेल हृदयसम्राट, मांजरीतील हॉटेल कप्तान, बुधवार पेठेतील ग्रीन पॅलेस रेस्टॉरंट, मार्के टयार्डातील समाधान गाळा क्र. ११, महात्मा फु ले मंडई, हडपसर गाडीतळ येथील शिवसमर्थ भोजनालय, पुणे-सातारा रस्त्यावरील हॉटेल साईनाथ व्हेज, खराडीमधील थिटे वस्ती येथील हॉटेल कोल्हापूरी तडका, घोरपडीतील हॉटेल यशोदा, औंधमधील प्रतिभा महिला प्रतिष्ठान, धानोरीतील सागर रेस्टॉरंट, पिंपरी-चिंचवड महापालिके चे उपाहारगृह, यशवंतराव चव्हाण रुग्णालय, वल्लभनगर बसस्थानक, चिंचवडमधील संभाजीनगर येथील श्री गणेश स्वीट्स अॅण्ड भोजनालय,सांगवीतील श्री प्रसाद फू ड हॉस्पिटॅलिटी अॅण्ड भोजनालय, चिंचवडमधील मनपा व्यापारी संकु लातील सुनेत्रा महिला बचत गट आणि आकु र्डी रेल्वे स्थानक एकत्व फार्मर प्रोड्युसर कं पनी या ठिकाणी या थाळीचा लाभ देण्यात आला.
मोफत धान्य वाटपाबाबत अद्याप आदेश नाहीत
याबाबतचे आदेश अद्यापही प्राप्त झाले नसल्याने संचारबंदीच्या पहिल्या दिवशी धान्यवाटप करण्यात आले नाही. अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थींना प्रतिव्यक्ती तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ देण्याची तयारी शहर आणि जिल्हा अन्नधान्य वितरण विभागाने के ली आहे. मात्र, गरजूंमध्ये के शरी शिधापत्रिकाधारक येतात किं वा कसे?, याबाबत स्पष्टता नसल्याने हा विभाग शासनाच्या आदेशाच्या प्रतीक्षेत आहे, असे जिल्हा अन्नधान्य वितरण अधिकारी भानुदास गायकवाड यांनी सांगितले.