पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात सुरू असलेला मुसळधार पाऊस गुरुवारी सकाळपर्यंत कायम होता. त्यामुळे पानशेत धरण १०० टक्के भरले असून या धरणातून खडकवासला धरणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. परिणामी खडकवासला धरणातून दुपारी बारा वाजल्यानंतर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

           सध्या चारही धरणांमधील पाणीसाठा ९० टक्क्यांवर पोहोचला आहे. बुधवारी रात्रीपासून गुरुवारी सकाळपर्यंत टेमघर धरण क्षेत्रात तब्बल १७० मिलिमीटर, वरसगाव धरण परिसरात ८९ मि.मी, पानशेत धरण परिसरात ८० मि.मी, तर खडकवासला धरण क्षेत्रात १८ मि.मी. पाऊस पडला. बुधवारी रात्री चारही धरणांत २५.२३ टीएमसी पाणीसाठा होता. बुधवारी रात्रीच्या तुलनेत गुरुवारी सकाळी तब्बल २.६९ टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

water cut Pune
पुण्यात अघोषित पाणीकपातीला सुरुवात : येत्या बुधवारी ‘या’ भागातील पाणी बंद
Navi Mumbai, Kolkata Businessman, Cheated, Sugar Purchase, Rs 60 Lakh, Case Registered, crime news,
नवी मुंबई : साखर खरेदी व्यवहारात ६० लाख ७१ हजार रुपयांची फसवणूक 
electric bus
कल्याण परिसरातील प्रवाशांसाठी एकत्रित बस सेवेचा विचार; आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांची माहिती
Bullying of the driver and three hours of traffic on the highway
वाहन चालकाची दादागिरी… अन् महामार्गावर तीन तास कोंडी

          दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून चारही धरणांत पावसाने धुमाकुळ घातला आहे. त्यामुळे पानशेत धरण १०० टक्के, वरसगाव धरण ९० टक्के भरले आहे. पानशेत धरणातून खडकवासला धरणात सकाळी सात वाजता ९७७ क्युसेकने पाणी सोडण्यास सोडण्यास सुरुवात करण्यात आली. सकाळी आठ वाजता १९८० क्युसेक, साडेआठ वाजता ३९०८ क्युसेक, तर सकाळी नऊ वाजता ७३७६ क्युसेकने पाणी सोडण्यात आले. परिणामी खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरत आल्याने या धरणातून दुपारी बारा वाजल्यानंतर मुठा नदीत पाणी सोडण्यात येणार आहे, असे खडकवासला धरण साखळी प्रकल्पाचे सहायक अभियंता यो.स.भंडलकर यांनी सांगितले.

प्रमुख धरणांमधील पाणीसाठा टीएमसी, टक्क्यांत –

टेमघर                   २.७६      ७४.४६
वरसगाव               ११.६१    ९०.५७
पानशेत                 १०.४८     ९८.३८
खडकवासला        १.४८      ७४.९१
एकूण                   २६.३३    ९०.३२